
.ओझर: दि.११ वार्ताहर येथील क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष संतोष शिंदे उपाध्यक्ष मितल मंडलिक यांच्या हस्ते येथील माधवराव बोरस्ते विद्यालयात महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त वृक्षारोपण करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक सोपान वाटपाडे होते. ‘वृक्षारोपण काळाची गरज’ या विषयावर त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. व्यासपीठावर उपमुख्याध्यापक धैर्यशील पाटील पर्यवेक्षक दशरथ शिंदे उत्सव समितीचे पदाधिकारी सदस्य ज्येष्ठ शिक्षक व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन शिक्षक नरेंद्र डेरले यांनी केले.
