
!रावळगाव (प्रतिनिधी) – रावळगाव विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या चेअरमन आणि व्हा. चेअरमन पदासाठी नुकतीच निवड प्रक्रिया पार पडली. या निवडीत शिवसेनेच्या दादासाहेब भुसेगटाच्या प्रभावी नेतृत्वाखाली श्री. विठ्ठल दादाजी राजनोर यांची चेअरमन पदावर तर सौ. सुमनबाई राजेंद्र बच्छाव यांची व्हा. चेअरमन (उपाध्यक्ष) पदावर बिनविरोध निवड करण्यात आली आहे. या निवडीनंतर सोसायटीवर शिवसेनेचा भगवा फडकल्याने कार्यकर्त्यांमध्ये जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले असून, परिसरात दादासाहेब भुसेगटाची ताकद पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. निवडीनंतर आयोजित करण्यात आलेल्या बैठकीस सोसायटीचे सर्व संचालक, स्थानिक शिवसेना पदाधिकारी, ग्रामस्थ तसेच युवा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी नवनिर्वाचित चेअरमन विठ्ठल राजनोर यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, “सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या हितासाठी आणि सोसायटीच्या माध्यमातून गावचा सर्वांगीण विकास हेच आमचे मुख्य उद्दिष्ट राहील.” उपाध्यक्षपदी निवड झालेल्या सौ. सुमनबाई बच्छाव यांनी महिलांच्या सक्षमीकरणासाठी आणि पारदर्शक कारभारासाठी प्रयत्नशील राहण्याचे आश्वासन दिले. या बिनविरोध निवडीनंतर कार्यकर्त्यांत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, रावळगावसह संपूर्ण परिसरात दादासाहेब भुसेंच्या नेतृत्वाने चमक दाखविल्या बद्दल परिसरात त्यांच्या कार्याची पुन्हा एकदा जोरदार चर्चा सुरु आहे.छायाचित्र – रावळगाव वि. विं कार्यकारी सेवासोसायटी चेअरमन पदी विठ्ठल दादाजी राजनोर व व्हा.चेअरमन सुमनबाई राजेंद्र बच्छाव यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल विठ्ठल दादाजी राजनोर व नवनिर्वाचित सोसायटी सदस्यांचा सत्कार करताना महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री मा. दादासाहेब भुसे यांच्या समवेत रावळगाव शहर शिवसेनेचे पदाधिकारी शरद कासार, किशोर दुकळे, मनोहर राजनोर इत्यादी उपस्थित होते.
