
नांदगाव ( प्रतिनिधी) जय ज्योती जय क्रांती क्रांतीज्योती महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंती निमित्त कार्यसम्राट आमदार सुहास (आण्णा) कांदे व सौ. अंजुमताई सुहास कांदे यांनी नांदगाव शहरातील फुले चौक येथे महात्मा फुले यांच्या पुतळ्या पुष्प हार अर्पण करत अभिवादन केले. या वेळी बोलतांना अण्णांनी उपस्थितांना जयंती निमित्त शुभेच्छा दिल्या. व लवकर या ठिकाणी फुले दांपत्याचा _पूर्णाकृती पुतळा_ असेल आणि आपण अतिउत्साहात त्याचे अनावरण करू असे सांगितले. सोबतच डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचाही पूर्णाकृती पुतळा नांदगाव शहरात बसविण्यात येणार असल्याचे सांगितले. या वेळी शिवसैनिक, शिवसेना नेते, युवासेना, महिला आघाडी पदाधिकारी, फुले प्रेमी, महात्मा फुले उत्सव समितीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते. तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.








