
:ओझर दि.११ (वार्ताहर) येथील मविप्र संचालित माधवराव बोरस्ते विद्यालयात थोर समाज सुधारक जनसामान्यांचे आधारस्तंभ, स्त्री शिक्षणाचे अग्रणी, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुलेंच्या जयंतीनिमित्त प्रतिमेचे पूजन मुख्याध्यापक सोपान वाटपाडे उपमुख्याध्यापक धैर्यशील पाटील पर्यवेक्षक दशरथ शिंदे यांनी केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक सोपान वाटपाडे होते. याप्रसंगी फुलेंच्या जीवन कार्यावर विद्यार्थ्यांनी भाषणे केली. व्यासपीठावर राजेंद्र शिंदे अरुण सावंत आत्माराम शिंदे रेखा देशमाने मंगल सावंत सरोज खालकर आदी जेष्ठ शिक्षक उपस्थित होते. अध्यक्षीय भाषणात मुख्याध्यापक सोपान वाटपाडे यांनी, स्त्री शिक्षणाचे अग्रणी महात्मा फुलेंनी सत्यशोधक समाजाची स्थापना करून ग्रामीण भागात शैक्षणिक, सामाजिक, शेतकरी, कष्टकरी चळवळ उभारून महाराष्ट्रात मोठा लढा उभारून गरीब दीन दुबळ्यांना आधार देऊन न्याय मिळवून देण्याचे कार्य केल्याचे त्यांनी सांगितले. प्रास्ताविक शिक्षिका शितल हांडोरे यांनी केले. सूत्रसंचालन शिक्षक नरेंद्र डेरले यांनी केले.
