
ओझर: येथील बोरस्ते विद्यालयात वृक्षारोपण करताना शिक्षक व विद्यार्थी
ओझर:५( वार्ताहर) येथील ‘मविप्र’ संचलित सहकार महर्षी माधवराव बोरस्ते विद्यालयात पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न झाला. अध्यक्षस्थानावरून मुख्याध्यापक सोपान वाटपाडे म्हणाले की, येणाऱ्या पावसाळ्यात दोन-तीन झाडे प्रत्येकाने नक्की लावा. त्यांची काळजी घ्या. झाडे पण नक्कीच तुमच्या पुढच्या पिढीची काळजी घेईल असा संदेश त्यांनी विद्यार्थ्यांना दिला. याप्रसंगी उपमुख्याध्यापक सतीश केदार, पर्यवेक्षक दशरथ शिंदे, शिक्षक आत्माराम शिंदे, हरितसेना प्रमुख दादासाहेब सोनवणे यांचे हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी ग्रंथपाल अनिता भंडारे पुंडलिक जाधव व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.
