
शिवा बाबा वाघ प्रतिष्ठान आयोजित शहादू शिवाजी वाघ स्मृती राज्यस्तरीय पाचवा साहित्य कलाकृती पुरस्कार वितरण व राज्यस्तरीय गझल वाचन स्पर्धा 2026 दिनांक 4 जून 2026रोजी पांडुरंग कृपा लॉन्स, येवला येथे अतिशय उत्साहात हा सोहळा पार पडला. हा नेत्र दीपक सोहळा साहित्यातील तिन्ही वाघांनी व त्यांच्या मातोश्री व कुटुंबीयांनी तसेच मित्र परिवारांनी हा ऐतिहासिक सोहळा घडवून आणला त्याबद्दल सर्वप्रथम मी या सर्वांचे मनापासून खूप खूप आभार मानते.या कार्यक्रमासाठी मला विशेष पुरस्कार्थी म्हणुन बोलावले होते आणि गझल वाचन स्पर्धेतही सहभाग घेतला होता.खरंतर आम्ही चाबुकस्वार सर आणि मीं सलग पाच वेळा या सोहळ्यास उपस्थित राहिलो आहे .अशा कार्यक्रमातून साहित्याची सेवा घडते आणि नवनवीन साहित्यिक त्यांच्या साहित्यकृती, विचार एकायला मिळतात.नियोजन कस असावं,आयोजन कस असाव,संयोजन कस असाव याच मूर्तिमंत,देखणं उदाहरण म्हणजे शिवाबाबा वाघ प्रतिष्ठान*. या संमेलनासाठी येणाऱ्या सर्व
कवी,कवयित्री व मान्यवरांच्या राहण्याची,खाण्याची उत्कृष्ट सुविधा करण्यात आली होती. कार्यक्रमाला येणाऱ्या प्रत्येकाने सुखरूप आणि वेळेत यावर यासाठी महाराष्ट्रातून येणाऱ्या जाणाऱ्या सर्व मार्गांचे व जवळच्या प्रेक्षणीय स्थळांची माहिती लिंक द्वारे पाठवण्यात आली होती.
या कार्यक्रमाचा उद्घाटन सोहळा अतिशय उल्लेखनीय आणि नावीन्यपूर्ण पद्धतीने पार पडला. उल्लेखनीय बाब म्हणजे या उद्घाटन सोहळ्यामध्ये *दीप प्रज्वलन करण्यात आले नाही तर महामानवांना पुष्पहार अर्पण करून त्यांच्या प्रतिमेवर पुष्पांची उधळण करण्यात आली व ज्या साहित्यकृती पुरस्कारासाठी पाठवण्यात आल्या होत्या त्या सर्व साहित्य कृतींचा सन्मान म्हणून त्यां पुस्तकांवर पुष्पांचा वर्षाव करण्यात आला. हा नाविन्यपूर्ण उपक्रम सर्वप्रथम या प्रतिष्ठान मध्ये पाहायला मिळाला.*
भव्य दिव्य विचार मंच,उत्कृष्ट साऊंड सिस्टिम आणि उपस्थित सर्वांना बसण्यासाठी सुयोग्य अशा पद्धतीचे अचूक नियोजन करण्यात आले होते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे वेळेचे भान ठेवण्यात आले होते. पहिल्या सत्रामध्ये राज्यस्तरीय गझल वाचन स्पर्धा घेण्यात आली या स्पर्धेमध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून प्रसिद्ध कवी गझलकार गायक, कवयित्री आले होते त्यांनी आपल्या उत्कृष्ट रचना सादर केल्या आणि या रचनांचे परीक्षण करून क्रमांक काढण्यासाठी प्रसिद्ध व अभ्यासू, अनुभवी, निष्पक्ष असे परीक्षक उपस्थित होते .यामध्ये आपल्या पारनेर साहित्य साधना परिवारातील मा. संजयजी पठाडे सर, कोपरगावचे प्रसिद्ध गझलकार मा. राम गायकवाड आणि मा. गीतांजली वाबळे प्रसिद्ध गझलकार शिरूर हे सर्व परीक्षक होते. मी गझल वाचन स्पर्धेत भाग घेतला असल्यामुळे स्पर्धेसाठी 10.30सहकुटुंब उपस्थित होते .अतिशय सुनियोजित पद्धतीने ही स्पर्धा मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडली. स्पर्धेत पारनेर साहित्य समूह सदस्य साहेबराव घुले सर सहभागी होते.त्यानंतर प्रमुख उपस्थित असणाऱ्या पाहुण्यांची गझल महिफिल रंगली. यानंतर शहादू शिवाजी वाघ स्मृती राज्यस्तरीय साहित्यकृती पुरस्कार कार्यक्रम यासाठी आलेल्या कार्यक्रमातील माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी पुरस्कार वितरण केले. त्यानंतर सर्वांनी उत्कृष्ट,स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घेतला.
दुपारच्या सत्रामध्ये साहित्य कलाकृती पुरस्कार वितरण व गझल वाचन स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस वितरणाचा सोहळा मा. डॉ. नंदकुमार राऊत, मा. प्रा. दादासाहेब कोते, मा. प्रा. अर्जुन कोकाटे सर, मा.रवींद्र मालुंजकर सर, मा. रज्जाक सर, मा. स्वाती ठुबे, मा. शर्मिला गोसावी यांच्या उपस्थितीत पार पडला. या सोहळ्यामध्ये विविध क्षेत्रांमध्ये कार्य करणाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. सन्मान येथे करण्यात आला. तसेच निवडण्यात आलेल्या चार साहित्य कलाकृतींचा देखील मोठ्या थाटामाटात सन्मान करण्यात आला. त्यानंतर काव्यवाचन स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस आकर्षक सन्मानचिन्ह व सन्मानपत्र,पुस्तके भेट स्वरूपात देण्यात आली.
अनेक कवींच्या रचना, गजला ह्या दर्जेदार आणि काळजाला भीडणाऱ्या होत्या. विजेत्यांचे कौतुक तर करण्यात आलेच परंतु सहभागी असलेल्या सर्व कवींचा देखील सन्मानचिन्ह,सन्मानपत्र देऊन विचारमंचावर सन्मान करण्यात आला तसेच ज्यांनी ज्यांनी पुरस्कारासाठी साहित्यकृती पाठवल्या होत्या त्या सर्वांचा देखील विचारमंचावर सन्मान झाला. या पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी महाराष्ट्रातील प्रसिद्ध ज्येष्ठ,श्रेष्ठ असे मान्यवर लाभले होते.
शिवाबाबा वाघ प्रतिष्ठानचे विशेष म्हणजे त्यांच्या चार पिढ्यांपासून हा साहित्य वारसा जपण्यात आला आहे. आपल्या वडिलांचे,आजोबांचे जाण्याचे दुःख उरात न बाळगता त्या दुःखाचा आनंदाचा सोहळा कसा करावा याचे मूर्तीमंत उदाहरण म्हणजे शिवाबाबा वाघ प्रतिष्ठान..आहे .
शिवा बाबावाघ प्रतिष्ठान व त्यांच्या सर्व कुटुंबीयांचे मनापासून आभार व्यक्त करते .त्यांनी मला बोलावलं माझ्या गझलेची स्पर्धेसाठी निवड केली. माझ्यासारख्या अनेक नवकवीला एवढं मोठं विचारमंच उपलब्ध करून दिलं त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार व्यक्त करते.त्यांच्या पुढील कार्यासाठी त्यांना भरभरून शुभेच्छा देते.
श्रीमती . सुवर्णलता पांडुरंग गायकवाड
शिरूर, जिल्हा पुणे
9028795769
