
दिंडोरी (प्रतिनिधी ) दिनांक ५ जून २०२६ मविप्र संचलित जनता इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज दिंडोरी येथे जागतिक पर्यावरण दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी सामाजिक वनीकरण दिंडोरी विभागाचे श्री . पी . के. डांगे वनपरिमंडळ आधिकारी सामाजिक वनीकरण दिडोंरी, श्री दिनेश चौधरी वनरक्षक सामाजिक वनीकरण दिंडोरी यांच्या उपस्थितीत शालेय परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. प्राचार्य श्री.शरद शेजवळ यांनी विद्यार्थ्यांना पर्यावरण संवर्धन व वृक्षारोपणाचे महत्त्व पटवून दिले. यावेळी पर्यवेक्षक श्री.आर.एस.शिंदे , पर्यवेक्षक श्री.डी.के.टोपले, मुख्य लिपिक श्री.बाळासाहेब कदम, जेष्ठ शिक्षक श्री.देवरे सर, श्री.शेटे सर, श्री.गुंजाळ सर, श्री.कथार सर, श्री.कळमकर सर, श्री.पवार सर, श्रीमती महाले मॅडम, श्रीमती जाधव मॅडम, श्रीमती बागुल मॅडम, श्रीमती पाटील मॅडम, श्रीमती गुंजाळ मॅडम, श्रीमती आहेर मॅडम, श्रीमती बोरस्ते मॅडम, श्रीमती टोंगारे मॅडम, श्रीमती बच्छाव मॅडम, श्रीमती वाटवे मॅडम व दहावीचे विद्यार्थी उपस्थित होते सर्वांनी मिळून पर्यावरण संवर्धनाची शपथ घेतली. हरित सेना शिक्षक प्रमोद सोनवणे यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.
