
सिन्नर(प्रतिनिधी )११ एप्रिल २०२५ राष्ट्रपिता महात्मा फुले यांची १९८ वी जयंती व क्रांतिवीर खाज्या नाईक यांचा १६७ वा स्मृतीदिन निमीत्त महामित्र परिवार व आद्यक्रांतिकारक राघोजी ब्रिगेडच्या वतीने सिन्नर येथे अभिवादन! .*या कार्यक्रमाची सुरुवात क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व क्रांतीवीर खाजा नाईक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली

.या कार्यक्रमाचे अध्यक्ष महामित्र दत्ता वायचळे म्हणाले की *महात्मा फुले* हे विचारवंत,समाजसुधारक होते.उच्चवर्णीयांकडून होणा-या अन्यायापासुन,अत्याचारापासुन व गुलामगिरीतून शूद्रातिशूद्र समाजाची मुक्तता करणे व त्यांना हक्काची जाणीव करून देण्यासाठी त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली.शेतकरी आणि बहुजन समाजाच्या समस्यांना केंद्रस्थानी ठेवून पुरेगामी विचारांची मांडणी केली.व स्ञी शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली.छञपती शिवाजी महाराज यांची रायगडावरील समाधी शोधून पहिली जयंती साजरी केली.जनतेने त्यांना महात्मा हि उपाधी बहाल केली.त्यामुळे जनता त्यांना महात्मा फुले म्हणु लागले. *खाज्या नाईक* हे इंग्रज सैन्यामध्ये ते शिपाई होते त्यांच्या वर व्यापाऱ्यांचे संरक्षण करण्याची जबाबदारी होती.एकदा व्यापाऱ्यांची लुट करणाऱ्या लुटारूची खाज्या नाईकाकडून हत्या झाली त्यात नाईकाला शिक्षा झाली. इकडे इंग्रजांविरूद्ध बंडाचे वातावरण तापू लागले होते. ते शिक्षा भोगून आल्या नंतर बंडात सामिल झाले त्यांनी अनेक टोळ्या उभारून इंग्रजांचा खजिना लुटून गोरगरीबांना वाटून दिला इंग्रजांना मोठा हादरा बसला मग इंग्रजांनी बंड मोडून टाकण्यासाठी मोठं सैन्य पाठवले त्यात इंग्रजांबरोबर लढाई होऊन खाज्या नाईक व अनेक सहकारी मारले गेले.

ते देशासाठी व आपल्या हक्क अधिकारासाठी शहिद झाले.अशा महान क्रांतिसुर्यास व क्रांतिवीरास विनम्र अभिवादन!याप्रसंगी डॉ विजय लोहारकर, डॉ डी.व्ही.रूपवते यांनी क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व क्रांतीवीर खाजा नाईक यांच्या क्रांती विषयी आपले मनोगत व्यक्त केले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय मुठे प्रास्ताविक रामु इदे तर आभार बाळनाथ कार्ले यांनी मानले. यावेळी महामित्र दत्ता वायचळे, नगरसेवक रूपेशभाऊ मुठे, आद्यक्रांतिकारक राघोजी ब्रिगेड चे संस्थापक रामु इदे, सहसंस्थापक विजय मुठे, डॉ विजय लोहारकर,डॉ डी.व्ही.रूपवते,राजेंद्र बेंडकुळे,किरण मुठे,बाळनाथ कार्ले,दिनेश लोंढे, जितेंद्र भांगरे, पप्पू कांबळे,दिपक गोळेसर, विजय वरंदळ, बाळासाहेब कळंबे, रविंद्र देशमुख,ताहिर शेख, रामदास कुटे,शिवा सातभाई,अजय लोंढे, प्रकाश घेगडमल, यशराज झगडे, अशोक वरंदळ,आदि उपस्थीत होते.
