
नाशिक जिल्हा प्रतिनिधी -नवनाथ गायकर यांजकडुन-
जगदंब फाऊंडेशन संचलित अखंड मराठा समाज तथा सोयरीक संस्थेच्या वतीने मराठा समाजाचे वर वधु परिचय मेळाव्याचे रवि.दि.७ जुन रोजी वाडिवर्हे ता.इगतपुरी येथे स.१० वा. आयोजन करण्यात आले आहे.
ही माहिती मेळाव्याचे निमंत्रक मराठा सोयरीक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अशोक कुटे व मुरंबी येथील प्रतिष्ठित नागरिक चंद्रभान मते यांनी दिली आहे.
वाडिवर्हे येथील वृदांवन लॉन्स येथे या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी वाडिवर्हे औदयोगिक ग्रामपालिकेचे सरपंच रोहिदास पाटिल कातोरे यांचे सहकार्य लाभले आहे.
दरम्यान समाजातील इच्छुक वर वधुनी या वेळी मोठया संख्येने हजर रहावे असे आवाहन भाजपा माजी तालुका अध्यक्ष नंदु पाटिल गाढवे यांचेसह आयोजकानीं केले आहे.
