
लेखक
नवनाथ अर्जुन पाटिल गायकर
आशिया खंडातील एक प्रचंड समृद्ध असलेला देश म्हंणजे हिंदोस्थान.या देशावर हजारो वर्ष परकिय क्रुर आक्रमकानीं धाडी घालुन प्रचंड लुट केली.अनेकानीं देशाच्या विविध प्रांत, प्रदेश ताब्यात घेऊन इथली राजेशाही मोडुन काढली.इथली प्रजा,राजा सगळे गुलाम व आश्रित बनवले गेले.
शेकडो वर्ष गुलामगिरीत खितपत पडलेल्या हिंदोस्थानात पुण्याच्या मामुली जहागिरदार पुत्राने आर्य चाणक्य नीतीचा वापर करुन साम, दाम, दंड व भेद वापरुन इथल्या मुजोर व मस्तवाल परक्या आक्रमक शासनकर्त्यानां वठणीवर आणत स्वराज्य स्थापन केले. व ६ जुन या पवित्र व मंगलमय दिनी राज्याभिषेक करुन समस्त हिंदोस्थान हिंदु मध्ये नवचेतना भरवली व आक्रमक, क्रुर सत्ताचां विनाश करत त्यांना त्यांची औकात दाखवुन दिली.
हिंदोस्थानच्या इतिहासात म्हणुनच शिवराज्याभिषेक ही अभुतपुर्व व क्रांतीकारी घटना मानायला हवी.या घटनेने पराभुत मानसिकतेतुन हिंदु बाहेर आला व नव्याने राष्ट्रउभारणीस वेग आला.
शिव राज्याभिषेका पुर्वीचा हिंदोस्थान म्हंणजे एक प्रचंड समृद्धी ने नटलेला देश होता.
आर्य चाणक्य, गौतमीपुत्र सम्राट सातकर्णी, सम्राट हर्षवर्धन, सम्राट चंद्रगुप्त, सम्राट अशोक, महाराज पुरु अशा कितीतरी हिंदोस्थानच्या सम्राटानीं या देशावर राज्य केले व हा देश सांस्कृतीक, आर्थीक, धार्मिक, सामाजिक व शैक्षणिक अशा चौफेर आघाडीवर हे राष्ट्र बल संपन्न बनवले.
एखादया प्रचंड श्रीमंत माणसाचीं अफाट धन संपत्ती पाहुन भुकेकंगाल, चोर, रानटी लोकानीं ती लुटण्यासाठी नाना प्रयत्न करावे तद्वत हिंदोस्थानची अफाट संपत्ती पाहुन अरब, आफ्रिका व आशिया प्रांतातील भुकेकंगाल, रानटी व चोर भामट्या लोकानीं हिंदोस्थानवर धाडी घातल्या.
अर्थात बाहेरील चोरास आतुन मदत मिळणे गरजेचे असते, त्यामुळे त्यांचे चौर्यकर्म सुफल होते. त्याप्रमाणे या देशातंर्गत हरामी जयचंदानीं या रानटी टोळधाडीस आवतण देत व भरपुर सहाय्य करत हा देश उध्वस्त करणेसाठी भरपुर सहाय्य केले.
सन सातशे शतकापासुन सोळाव्या शतकापर्यंत ही लुट अविरत सुरु होती. या कालखंडात हया देशाचा खर्या अर्थाने प्रचंड विनाश झाला.
तक्षशिलासारखे जागतिक विदयापीठ नष्ट झाले.हिंदु सनातन धर्मातील महान व प्राचीन अभ्यासग्रंथ नष्ट झाले.इथला महान हिंदु धर्म धोक्यात आला.कितीतरी लाखो हिंदुचें धर्म परिवर्तन झाले. लाखो गुलाम झाले. इथल्या कोटयावधी स्रियानां नासवलं गेलं.
शेकडो वर्ष बरबादीच्या अगणित कहाण्यानीं हिंदोस्थान बरबटुन गेला.
अशा या निराशाजनक कालखंडात पुणे, सुपे परगण्यातील जहागिरदार शहाजी राजे व त्यांच्या पत्नी मातोश्री जिजाऊ यांनी हिंदवी स्वराज्याचे स्वप्न पाहिले आणि या स्वप्नास शिवाजी राजानीं आकार दिला.
प्रभु श्रीराम व प्रभु श्रीकृष्ण, आर्य चाणक्य दी गौरवशाली भारतीय परंपरेची शिकवण व संस्कार मिळालेल्या राजानीं साम, दाम, दंड व भेद आदी मार्ग वापरुन एकाचवेळी दख्खन प्रांतातील आदिलशाही, कुतुबशाही व केंद्रीय सत्ता असलेले मोगल साम्राज्य यांस धडका देत त्यास खिळखिळे केले व हिंदु धर्माची पुनर्स्थापना केली.
हिंदोस्थानातील शिवाजी राजाचां उदय होण्यापुर्वीच्या कितीतरी आधी महाराष्ट्र मुलखात देवगिरीचे विजयनगरचे महाबलाढय राज्य होते.जे लुटुन फस्त केल्यानंतर शेकडो वर्ष हिंदु समाज हा केवळ शोषित व वंचित बनुन राहिला.
शिवाजी राजानीं हया परिस्थिती मध्ये क्रांतिकारी बदल केला आणि पुन्हा एकदा हिंदु धर्म निद्रिस्ततेतुन खडबडुन जागा झाला.
काशीच्या गागाभट्ट व विद्वानांनी राजाच्यां नेत्रदिपक व अद्भुत पराक्रमानंतर हिंदु पदपातशाहीची कल्पना मांडली व अभुतपुर्व असा क्रांतीकारी क्षण राज्याभिषेकाच्या माध्यमातुन हिंदोस्थानात अवतीर्ण झाला.
शिवाजी राजे छत्रपती झाले आणि समस्त हिंदोस्थानातील हिंदुच्यां छात्रतेजाचा उदय झाला.यातुनच पुढे आसाम मधील ओहोम या राजघराण्याने सेनापती फुकन यांच्या नेतृत्वाखाली लढा देत प्रबळ मोगलानां पलायन करावयास लावले.
बुदेंलखंडात छत्रसाल, पंजाबात शीख राजानीं, हरियाणात गोकुळदास वगैरे जाट यौद्ध्यानीं मोगली आक्रमकानां परास्त करत हिंदु राज्ये उभारली.
शिवराज्याभिषेक ही भारतीय इतिहासातील खुपच क्रांतीकारक घटना आहे.याचा दुरगामी परिणाम झाला आहे.
कदाचित हे झालेच नसते तर आज हा देश मुस्लिमबहुल बनला असता.इथला धर्म, इतिहास सगळा पुसला गेला असता.
पारसी, ज्यु लोकाप्रमाणे हिंदु लोक अल्पसंख्य बनले असते. आपल्याच मायभुमीतुन त्यांना एकतर पलायन करावे लागले असते किंवा मान खाली घालुन गुलामासारखे जगावे लागले असते.
शिवराज्याभिषेकाने हिंदु साम्राज्याची पुनर्स्थापना झाली. हिंदु पुन्हा एकदा सशक्त बनला.
हे फार मोठे उपकार छत्रपती शिवाजी राजानीं उभ्या हिंदोस्थानावर केले. त्यापुढचा सगळा इतिहास हा राजाच्यां अफाट कर्तृत्व व प्रेरणादायी कार्यामुळे घडला गेला.
