
बंडखोरीमुळे लढतीची वेळ, मात्र विजयाचा मार्ग सुकर
नाशिक जिल्हा प्रतिनिधी – नवनाथ गायकर यांजकडुन –
नाशिक विधानपरिषदेच्या निवडणुकीत महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे यांचे पारडे जड झाले आहे. महाविकास आघाडीने ऐनवेळी शेपुट घातल्याने दराडेंचा विजयाचा मार्ग सुकर झाला आहे.अर्थात रिंगणात काही महायुतीचे बंडखोर उमेदवार असले तरी कुठलाच पक्ष पाठिशी नसल्याने मताचीं जुळवाजुळव करणे अशक्यप्राय आहे. यामुळे नरेंद्र दराडे हे दुसर्यादां आमदार बनणार हे निश्चित झाले आहे.आता फक्त मते किती मिळतात याकडेच सगळयाचें लक्ष लागून आहे.
महायुतीची मतदार संख्या या मतदार संघात जास्त आहे. या शिवाय महायुतीतील तीनही घटक पक्षामधील ताळमेळ पाहता महायुतीला येथे दगा फटका होईल असे वाटत नाही.
दुसरीकडे महाविकास आघाडीत ही जागा उबाठा कडे होती. मात्र उबाठा स सक्षम उमेदवारही मिळु नये ही मोठी लाजीरवाणी गोष्ट असुन विरोधकानीं हातपायच गाळल्याचे दिसत आहे.
विरोधकाचीं ही पराभुत मानसिकता महायुतीस विजयाकडे नेणारी ठरली.
अर्थात महायुतीत गोकुळ गितेच्यां रुपाने बंडखोरी झाली असली तरी ही शर्यत ससा व कासवाची ठरणार आहे.
गितेचीं भिस्त महाविकास आघाडीच्या मतावर असली तरी मतदारानां मात्र गीतेनां मतदान करावे असे बंधन नाही. यामुळे या मतदाराचां कौल हा धनावर निर्भर असुन ही मते महायुतीकडेही वळु शकतात.त्यामुळे गीतेनां ही निवडणुक मोठी कठिण झालेली.
दराडेनां ही निवडणुक सोपी आहे. त्यांचे वैयक्तिक व्यवस्थापन ही तगडे असुन महायुतीचे भक्कम पाठबळ, निवडणुकीचा अभ्यास, सर्वदुर मतदाराशी परिचय, आर्थिकदृष्टय़ा ही भक्कम अशा सगळयाच बाबतीत ते उजवे असल्याने त्यांचा विजय निश्चित आहे.
