
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित ३२९२ वा दिवस
आपल्याच वैयक्तिक मुक्तीकामनेने तुम्ही जर सर्वस्वाचा त्याग केला तर तो कसला त्याग? जगाच्या कल्याणासाठी स्वतःच्या मुक्तीवर देखील पाणी सोडण्याची तुमची तयारी आहे काय? तुम्ही स्वतः ब्रह्मस्वरूप आहात हे लक्षात घ्या. थोर लोकांनी महान त्याग करावा व सामान्य जनांनी त्याची फळे उपभोगावीत या गोष्टीला साऱ्या जगाचा इतिहास साक्ष देईल. ह्रदयात प्रेम, नि:स्वार्थ वृत्ती, चारित्र्य संपन्नता ठायी असेल तरच जय होता. तुमच्या ठिकाणी जर ज्वलंत श्रद्धा असेल, सर्वविजय प्रेम असेल, सर्वशक्तिमान पवित्र असेल तर अल्पकाळातच तुम्हाला यश मिळेल याची खात्री बाळगा. मत्सर व अहंकार यांचा त्याग करून दुसर्याच्या हितासाठी एकजुटीने कार्य करण्यास शिका. याचीच आपल्या देशाला आज अत्यंत गरज आहे.
*स्वामी विवेकानंद...*
●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●
★ भारतीय सौर जेष्ठ /शुक्रमास १५ शके १९४८
★ जेष्ठ अधिक वद्य /कृष्ण ५
★ शालिवाहन शके १९४८
★ शिवशक ३५१
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ विक्रम (रौद्र) संवत्सर २०८३
★ शुक्रवार दि. ५ जून २०२६
★ १७२३ जगप्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ एडम स्मित यांचा जन्मदिन
★ १९७३ राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे दुसरे सरसंघचालक माधव सदाशिव गोळवलकर गुरुजींचा स्मृतीदिन
★ जागतिक पर्यावरण दिन
🌳🌳 झाडे लावा, झाडे वाचवा 🌳🌳
