
नाशिक (प्रतिनिधी ) महाराष्ट्र साहित्य परिषद-शाखा नाशिकरोड आयोजित शिवयुगाची स्मरणगाथा यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावरील रांगोळ्यांची खुली स्पर्धा आयोजित केली आहे. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी अक्कलकोट संस्थानचे राजे श्रीमंत मालोजीराजे (तृतीय) संयुक्ताराजे भोसले रांगोळी प्रदर्शनाचे उद्घाटन करतील.
कार्यक्रम : शिवयुगाची स्मरणगाथा – २०२६
प्रमुख अतिथी : श्रीमंत मालोजीराजे (तृतीय) संयुक्तराजे भोसले
कार्यक्रमाचे अध्यक्ष – मा.श्री.हर्षित बारी, अपर आयकर आयुक्त
दिनांक : शनिवार ६, जून २०२६
वेळ : सायंकाळी ६.०० वाजता
स्थळ : कदम लॉन्स मंगल कार्यालय, आनंद नगर, नाशिकरोड
कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे. त्यास जास्तीत जास्त साहित्य रसिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात येत आहे.
रांगोळी प्रदर्शन शनिवार ६ जून आणि रविवार ७ जून या दोन्ही दिवशी खुले राहील.
रवींद्र मालुंजकर
उपाध्यक्ष – मसाप-शाखा नाशिकरोड
