
तालुका प्रतिनिधी – येवला तालुक्यातील पिंपळगाव जलाल येथील शिवाबाबा वाघ प्रतिष्ठान आयोजित शहादू शिवाजी वाघ स्मृती राज्यस्तरीय पाचवा साहित्य कलाकृती पुरस्कार सोहळा गुरुवार दि. ४ जून २०२६ रोजी संपन्न झाला. या सोहळ्यासाठी राज्यभरातील साहित्यिक उपस्थित असल्याचे अध्यक्ष मा संजय वाघ व सचिव राजेश वाघ यांनी कळविले आहे.

येवला तालुक्यातील पिंपळगाव जलाल येथील शिवाबाबा वाघ प्रतिष्ठान आयोजित शहादू शिवाजी वाघ स्मृती राज्यस्तरीय पाचव्या राज्यस्तरीय साहित्यकलाकृती पुरस्कार प्रदान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या अनुषंगाने प्रतिष्ठानने माहे डिसेंबर २०२५ मध्ये राज्यभरातील साहित्यिकांकडून आपल्या कलाकृती पुरस्कारासाठी मागविल्या होत्या. कथा संग्रह, कविता संग्रह, कादंबरी, ललित लेखसंग्रह अशा विविध प्रकारच्या राज्यभरातून जवळपास १८६ प्रवेशिकामधून तज्ज्ञ परीक्षकांनी निवड करून प्रत्येक साहित्य प्रकारातील प्रथम व व्दितीय क्रमांकासाठी निवड केली होती.

सोहळ्याच्या सुरुवातीला पहिल्या सत्रात गझलवाचन स्पर्धा आयोजित केली होती. या सोहळ्याचे उद्घाटन महापुरुषांच्या प्रतिमांना पुष्पमाला अर्पण करून केले गेले. या स्पर्धेसाठी परीक्षक मा संजय पठाडे, मा. गीतांजली वाबळे, मा. राम गायकवाड यांनी परीक्षण केले.

दुसऱ्या सत्रात साहित्य कलाकृती पुरस्कार प्रदान सोहळा संपन्न झाला यावेळी साहित्य कलाकृतींवर पुष्पवर्षाव करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले अशाप्रकारे पुष्पवर्षाव करून उद्घाटन करणे हा साहित्य क्षेत्रातील अभिनव प्रयोग पहिल्यांदाच पाहायला मिळाला. प्रसंगी सोहळ्यासाठी अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्याच्या पहिल्या महिला आमदार आदरणीय स्नेहलताताई बिपीनदादा कोल्हे यांच्या उपस्थितीत सोहळ्याचे अध्यक्ष डॉ नंदकुमार राऊत अवर सचिव, मंत्रालय, उद्घाटक मा. प्रा. दादासाहेब कोते, तर प्रमुख अतिथी मा अर्जुन कोकाटे, साहित्यिक मा. सुभाष सोनवणे, गझलकार मा रज्जाक शेख, औषध निर्माण अधिकारी मा. स्वाती ठुबे, मा फारूक शेख, नाशिकचे रविंद्र मालुंजकर आदी प्रमुख अतिथी उपस्थित होते.

यावेळी प्रमुख अतिथींच्या हस्ते साहित्य कलाकृती पुरस्कार प्रदान करण्यात आले तसेच राज्यस्तरीय गझलवाचन स्पर्धेतील स्पर्धकांना पुरस्कार देण्यात आले. यावेळी अध्यक्षीय भाषण करतांना डॉ नंदकुमार राऊत म्हणाले की वाचन संस्कृती लोप पावत आहे, तरुण वर्ग फक्त समाजमाध्यमावर रील्स बनवण्यात व्यस्त आहे. तरुणांमधला आळस, व्यसनाधीनता, बेजाबदारपणा वाढत आहे.
माणसांमध्ये अहंकार वृत्ती वाढत आहे, अहंकार वाढण्याचे महत्वाचे कारण म्हणजे अनुकूल काळात प्रतिकूल परिस्थितीचा विसर पडल्यास अहंकार वाढीस लागतो आजच्या काळात पुस्तक वाचनाचे प्रमाण कमी होत असून स्मार्टफोनचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. विज्ञानाची प्रगती स्वीकारताना त्याचे आहारी जाऊ नये याची जाणीव समाजाने ठेवणे आवश्यक आहे. असे प्रतिपादन कोपरगाव तालुक्याच्या पहिल्या महिला आमदार स्नेहलताताई बिपीनदादा कोल्हे यांनी केले.
या सोहळ्यासाठी प्रतिष्ठानचे अध्यक्ष- संजय वाघ, सचिव- राजेश वाघ, उपाध्यक्ष – यमुना अशोक गोतीस, मार्गदर्शक अंजनाबाई शहादू वाघ, सदस्य प्रशांत वाघ, प्रणित वाघ, प्रणिल वाघ, प्रणिता वाघ, भाग्यश्री बनसोडे, तेजस वाघ, सपना वाघ, यश वाघ, आदित्य वाघ, सुजाता खर्चे, सुधीर गोतीस, पूजा गोतीस, प्रविण गोतीस, अभिजित गोतीस, खजिनदार अशोक गोतीस, जालिंदर नारळकर, नीता वाघ, जयश्री वाघ, उषा वाघ, मनीषा गोतीस आदींनी मेहनत घेऊन हा सोहळा यशस्वी केला अशी माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष मा. संजय वाघ, सचिव मा राजेश वाघ यांनी कळविले आहे
