
( मंगेश पाटील तळोदा)तळोदा नंदुरबार नगरपालिकेने सर्वसाधारण सभेत कत्तलखाना दुरुस्तीच्या नावाखाली बंद असलेला कत्तलखाना पुन्हा सुरू करण्याचा ठराव मंजूर केल्याच्या निषेधार्थ विविध सामाजिक व हिंदुत्ववादी संघटनांकडून शासनाला निवेदन देण्यात आले.
या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, नंदुरबार जिल्हा गोवंश हत्या बंदी असलेल्या राज्यात असून, यापूर्वीही जिल्ह्यात अवैध गोवंश हत्या प्रकरणे उघडकीस आली आहेत. अशा परिस्थितीत कत्तलखाना पुन्हा सुरू झाल्यास पर्यावरणाचा प्रश्न निर्माण होण्याबरोबरच धार्मिक तेढ निर्माण होऊन सार्वजनिक शांतता भंग होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
तसेच, केवळ गोवंश नव्हे तर इतर पशुबळीमुळेही पर्यावरणावर विपरीत परिणाम होऊ शकतो, असे निवेदनात म्हटले आहे. त्यामुळे शासनाने तातडीने हस्तक्षेप करून कत्तलखाना सुरू करण्याचा ठराव रद्द करावा, अन्यथा मोठे आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.
हे निवेदन मुख्यमंत्री व गृहमंत्री महाराष्ट्र शासन यांच्याकडे तहसीलदार मार्फत पाठविण्यात आले.
आपले
खालील सह्या करणार विश्व हिंदू परिषद बजरंग दल कार्यकर्ते
अजय ठाकरे बजरंग दल जिल्हा संयोजक
विजयराव सोनवणे देवगिरी प्रांत विशेष संपर्क सहप्रमुख
राजेश चौधरी जिल्हा विशेष संपर्क सदस्य
मुकेश जैन मा. शहराध्यक्ष
मोहन रघुवंशी सत्संग मंडळ प्रमुख
महेंद्र गुरव सहसंयोजक
कीर्ती कुमार माळी
समीर चौधरी
हर्षल सूर्यवंशी शहर संयोजक
कुणाल माळी गोरक्ष प्रमुख
अविनाश ठाकरे
व इतर कार्यकर्त्यांच्या सोय आहे
