
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित ३२९१ वा दिवस
जोवर बुद्धीच्या वा तर्कविचाराच्या पलीकडील उच्च असे काही लाभत नाही तोवर बुद्धीला वा तर्कविचाराला धरून असा, त्याची कास सोडू नका; आणि त्या बुद्धीपलीकडील अवस्थेत पोहोचल्यानंतर तुमचे तुम्हालाच कळून येईल की ती तर्कविचारापेक्षा उच्च आणि श्रेष्ठ अशी अवस्था आहे, कारण ती तुमच्या तर्कविचाराला विरोधी असणार नाही. ती अवस्था तर्काच्या 'पलीकडील' आहे, तर्काच्या 'विरुद्ध' नाही. ही बुद्धीपलीकडील वा तर्कविचारापलीकडील वा जाणिवेपलीकडील भूमी म्हणजेच समाधिअवस्था होय; परंतु ज्ञानतंतूंच्या रोगामुळे येणाऱ्या मूर्छेला समाधी मानण्याची चूक मात्र कदापि करू नका. पुष्कळजण स्वतःला समाधी प्राप्त झाल्याचा उगीचच दावा करतात, उपजतप्रवृत्तीने होणाऱ्या ज्ञानालाच भ्रमाने अंतःस्फूर्ती वा समाधी समजतात, ही फार भयंकर गोष्ट आहे. एखाद्याला खरोखर समाधी लागली आहे की तो ज्ञानतंतूंचा काही विकार आहे हे बाहेरून समजण्याचा काही मार्ग नाही. हे बाहेरून ठरविण्याची काहीच कसोटी नाही. खरीखुरी समाधी लाभली आहे किंवा नाही हे ज्याचे त्यालाच कळू शकते.
*स्वामी विवेकानंद...*
●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●
★ भारतीय सौर जेष्ठ /शुक्रमास १४ शके १९४८
★ जेष्ठ अधिक वद्य /कृष्ण ४
★ शालिवाहन शके १९४८
★ शिवशक ३५१
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ विक्रम (रौद्र) संवत्सर २०८३
★ गुरुवार दि. ४ जून २०२६
★ १९४६ दाक्षिणात्य चित्रपटातील सुप्रसिध्द गायक, चित्रपट अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक आणि पद्मश्री व पद्मभूषण पुरस्कार विजेते एस. पी. बालसुब्रम्हण्यम यांचा जन्मदिन
★ १९४७ लोकप्रिय मराठी चित्रपट अभिनेते अशोक सराफ यांचा जन्मदिन
★ राष्ट्र सेवादल दिन.
संकलन – प्रा. अमोल श्रीकृष्ण अहिरे, नाशिक
