
मनमाड (प्रतिनिधी ) भाजपा नाशिक उत्तर जिल्हा पंडित दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण महाअभियान 2026 संपन्न अंतर्गत भारतीय जनता पार्टी, नाशिक उत्तर जिल्ह्याची निवासी कार्यकर्ता अभ्यास कार्यशाळा केशव सुष्टी स्व.रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी, उत्तन (मीरा-भाईंदर, मुंबई) येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली
या प्रशिक्षण वर्गात संघटन, सामाजिक व राजकीय विषय, भाजपा इतिहास आणि विकास, सोशल मीडिया कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), भाजपा चा कार्य विस्तार, कार्य पद्धती, विचार परिवार, वैचारिक अधिष्ठान, मोदी सरकार @12 योजना, बूथ विस्तार, एस आय आर, व्यवहारिक सत्र देशा समोरील भविष्यातील आव्हाने यांसारख्या विविध विषयांवर मान्यवर नेते, आमदार, नगरसेवक आणि ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी मार्गदर्शन केले. पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या अंत्योदयाच्या विचारांना केंद्रस्थानी ठेवत समाजातील शेवटच्या घटकापर्यंत विकास पोहोचविण्यासाठी आणि राष्ट्रहितासाठी अधिक प्रभावीपणे कार्य करण्याचा संकल्प प्रत्येक भाजपाच्या कार्यकर्त्याने करावा असे मान्यवर वक्त्या नी सांगितले आदरणीय प्रदीप जी पेशकर यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ एक विचार परिवार यांनी घेतलेल्या महत्वपूर्ण सत्रा चे अध्यक्ष म्हणून भाजपा जिल्हा उपाध्यक्ष नितीन पांडे यांना सन्मान मिळाला

या कार्यशाळेत विविध विषयांवर मान्यवरांनी मार्गदर्शन करत संघटन बळकटीकरण, प्रभावी जनसंपर्क, नेतृत्व विकास आणि लोकसेवेतील कार्यकर्त्यांची भूमिका याविषयी मौल्यवान विचार मांडले. सशक्त संघटन हीच लोकसेवेची खरी ताकद आहे, या भावनेतून विचार, कार्य आणि जनहिताची बांधिलकी अधिक दृढ करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आग्रह केला कार्यकर्त्यांच्या क्षमतावृद्धीद्वारे पक्षाची विचारधारा अधिक प्रभावीपणे समाजापर्यंत पोहोचविण्यासाठी अशा प्रशिक्षण उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.
या प्रशिक्षण वर्गात भाजपा प्रदेश सरचिटणीस माधवी नाईक, प्रदेश महामंत्री मा. राजेशजी पांडे, प्रदेश महामंत्री मा. विजयजी चौधरी, आमदार अतुल भातखळकर,
आमदार मा.अमोल जावळे, आमदार मा.विक्रांतजी पाटील, विधानपरिषद भाजपा गटनेते आमदार प्रवीणजी दरेकर,आमदार डॉ. राहुल दादा आहेर,मुख्यालय प्रभारी मा. रविजी अनासपुरे, प्रदेश प्रवक्ते मा. प्रदीपजी पेशकर, ऍड. अनिकेत निकम , सरिताजी हरताळे यांनी वरील विषया वर मार्गदर्शन करीत विचार मांडले.नाशिक जिल्हा उत्तर चे भाजपा जिल्हाध्यक्ष मा. यतीनभाऊ कदम यांनी यशस्वी पणे कार्य शाळेचे संयोजन केले भाजपा नाशिक जिल्हा महामंत्री आनंद जी शिंदे यांनी या कार्यशाळेचे दोन दिवस अचूक सूत्रसंचालन केले या कार्यशाळा प्रशिक्षण वर्गात माजी जिल्हा अध्यक्ष शंकर राव वाघ, नंदकुमार खैरनार, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष नितीन पांडे, जिल्हा व्यापारी आघाडी चे अध्यक्ष व नगरसेवक दत्तराज छाजेड, मोहन शर्मा, मनोज दिवटे, सतीश मोरे, सुवर्णा ताई जगताप, सारिका ताई डेरले आदी प्रमुख मान्यवर सह नाशिक उत्तर जिल्ह्यातील पदाधिकारी आजी माजी लोक प्रतिनिधी, मंडल अध्यक्ष आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होतें
