
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित २८७३ वा दिवस जो विधवांच्या डोळ्यातले अश्रू पुसत नाही, जो अनाथांच्या मुखी घास भरवत नाही अशा देवावर किंवा धर्मावर माझा विश्वास नाही. केवळ पोथी-पुराणांमध्ये कितीही उत्तम मांडलेले तत्वज्ञान असले तरीही, मी त्याला धर्म म्हणणार नाही. ज्या धर्माचा तुम्ही अभिमान बाळगाता तो धर्म आचरणात आणा. देव तुमच्यावर कृपा करो. प्रेम कधीच विफल होत नाही आणि सत्य कधी पराजित होत नाही. आज नाही तर उद्या, उद्या नाहीतर अनेक युगांनी प्रेमाचाच विजय होणार आहे. *स्वामी विवेकानंद…* *●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●*
*★ भारतीय सौर २१ चैत्र शके १९४७*
★ चैत्र शुद्ध /शुक्ल १४
★ शालिवाहन शके १९४७
★ शिवशक ३५१
★ विक्रम सम्वत् २०८२
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ शुक्रवार दि. ११ एप्रिल २०२५
★ १८२७ स्त्री शिक्षणाचे आद्य प्रवर्तक महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती.
★ १८६९ राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पत्नी कस्तुरबा गांधी यांचा जन्मदिन.
★ १९१९ आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेची स्थापना.
★ २०१५ महाराष्ट्रचे माजी शिक्षणमंत्री डॉ. बळीरामजी हिरे यांचा स्मृतिदिन.
*संकलन – प्रा. अमोल श्रीकृष्ण अहिरे, नाशिक*


