
मनमाड ( प्रतिनिधी )श्री निलमणी मंदिरात अधिक मास चतुर्थी निमित्ताने पुस्तकांचा नैवेद्य 2100 श्री गणपती अथर्वशीर्ष स्तोत्र पुस्तकांची भक्तांना प्रसाद रुपी भेट मनमाड शहाराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणारा गणपती म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात “आम्ही परंपरा पाळतोआम्ही संस्कृती चे रक्षण करतो हें ब्रीद वाक्य घेऊन धार्मिक, सामाजिक,सांस्कृतिक शैक्षणिक, आरोग्य, सेवा, पर्यावरण क्षेत्रात 1997 पासून सतत 30 वर्ष कार्य करणाऱ्या श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे अधिक जेष्ठ मास संकष्ट चतुर्थी निमित्ताने श्री निलमणी महा गणेशास सुमारे 2100श्री गणपती अथर्वशीर्ष स्तोत्र या पुस्तकांन नैवेद्य अर्पण करण्याचा अभिनव धार्मिक कार्यक्रम संपन्न झाला हिंदू संस्कृती मध्ये अधिक मासा (पुरुषोत्तम मास ) मध्ये दाना चे प्रचंड महत्व आहे

याच धार्मिक योगा चे औचित्य साधून श्री गणेश भक्तांना मध्ये श्री गणपती भक्ती वाढावी म्हणून ह्या अभिनव कार्यक्रम चे आयोजन करण्यात आले असे श्री निलमणी ट्रस्ट चे सचिव नितीन पांडे यांनी या वेळी सांगितले त्यानंतर ही श्री गणपती अथर्वशीर्ष स्तोत्र पुस्तकं सर्व गणेश भक्तांना अधिक मासा निमित्ताने प्रसाद भेट म्हणून देण्यात आली या अभिनव धार्मिक कार्यक्रमाला श्री नीलमणी ट्रस्ट चे अध्यक्ष किशोर गुजराथी सचिव नितीन पांडे उपाध्यक्ष शेखर पांगुळ विश्वस्त गोविंद रसाळ, प्रज्ञेश खांदाट, नारायण फुलवाणी, भिकाजी कुलकर्णी, तसेच अक्षय सानप, भरत छाबडा, आकाश वाघ, अभिषेक पितृभक, राहुल लांबोळे संदीप शिनकर आदी मान्यवर सह श्री गणेश भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रम चे संयोजन श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट मनमाड तर्फे विश्वस्त मंडळाने केले
