
मनमाड( वृत्तसेवा )महायुती सरकारमधील महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात येत असलेल्या लोकाभिमुख निर्णयाची माहिती सुलभ पद्धतीने जनतेला व्हावी यासाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती दीपक गोगड यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू करण्यात आलेल्या सारथी या सोशल मीडिया पेजचे अधिकृत अनावरण महसूलमंत्री चंद्रशेखर चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते मुंबई येथे छोटेखानी कार्यक्रमात संपन्न झाले.
राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वाखाली महसूल विभागाने अनेक लोकाभिमुख निर्णयांचा धडाका लावलेला आहे, सर्वसामान्य जनतेसाठी शासनाने घेतलेले हे निर्णय अतिशय महत्त्वपूर्ण आहेत मात्र या निर्णयांची माहिती जनतेपर्यंत पोहोचण्यास अधिक गती प्राप्त व्हावी म्हणून चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वाखाली आणि मनमाड बाजार समितीचे माजी सभापती दीपक गोगड यांच्या संकल्पनेतून हा अभिनव उपक्रम भारतीय जनता पक्षाच्या वतीने राबविण्यात येत आहे. सारथी या सोशल मीडिया पेज द्वारे महसूल विभागातील सर्व निर्णयांची माहिती एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे यामुळे जनसामान्यांना या निर्णयांचा फायदा मुदतीत घेण्यास मदत होणार आहे. शासन आणि जनता यामधील दुवा म्हणून हे सोशल मीडिया पेज कार्यरत राहणार आहे, या सोशल मीडिया पेजचे अधिकृत अनावरण ना.चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते मुंबई येथील चित्रकूट निवासस्थानी संपन्न झाले. या समाजोपयोगी उपक्रमाबद्दल मंत्री महोदयांनी गोगड यांचे कौतुक केले. या प्रसंगी गोगड यांनी कायम मार्गदर्शन करणारे ना. गिरीशभाऊ महाजन, प्रदेश कार्यालय प्रभारी रवीजी अनासपुरे, महामंत्री विजयजी चौधरी, जिल्हाध्यक्ष यतीन कदम, भाजपा नेते गणेश धात्रक यांचे आभार मानले आहेत. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती दीपक गोगड आणि या सोशल मीडिया पेजचे संचालन करणारे श्रीराज कातकडे व आनंद बोथरा हे उपस्थित होते. या सोशल मीडिया पेजला अधिकाधिक नागरिकांनी फॉलो करावे आणि शासनाच्या निर्णयांची माहिती मिळवावी असे आवाहन संचालक श्रीराज कातकडे व आनंद बोथरा यांनी केले आहे.
सारथी सोशल पेजचे अनावरण
