
दिंडोरी ( प्रतिनिधी ) मविप्र संचलित जनता इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज दिंडोरी येथे आंतरराष्ट्रीय सायकल दिन उत्साहात साजरा करण्यात आला. आंतरराष्ट्रीय सायकल दिवस महत्त्व जर प्रत्येक व्यक्तीला निरोगी व तंदुरुस्त जगायचे असेल तर नियमित ३० मिनिटे सायकल चालवणे आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर असते. त्यामुळे रात्री शांत झोप लागते. बुद्धी तल्लख होते. रोगप्रतिकारक शक्ती वाढते.शरीरातील अतिरिक्त कॅलरीज बर्न होण्यास मदत होते. देशातील नागरिकांनी जवळपासच्या ठिकाणी जाण्यासाठी मोटरसायकल ऐवजी सायकलचा वापर केला तर दररोज शेकडो लिटर पेट्रोलचा वापर कमी होण्यास मदत होईल.त्याच प्रमाणे पर्यावरण संवर्धन करण्यात सायकल महत्त्वपूर्ण भूमिका निभावत असते. म्हणून जागतिक सायकल दिवस निमित्त हरित सेना शिक्षक प्रमोद सोनवणे यांनी ओझर मिग ते दिंडोरी सायकल प्रवास करुन विद्यार्थ्यांना सायकल चालण्याचा संदेश दिल्याबद्दल पर्यवेक्षक श्री.आर.एस.शिंदे, पर्यवेक्षक श्री.डी.के.टोपले यांच्या हस्ते श्री.प्रमोद सोनवणे सरांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी जेष्ठ श्री.देवरे सर, श्री.कथार सर, श्री.पाटील सर, श्री.कळमकर सर, श्री.गंजाळ सर, श्री.पवार सर, श्रीमती गुंजाळ मॅडम, श्रीमती आहेर मॅडम, श्रीमती पाटील मॅडम, श्रीमती महाले मॅडम, श्रीमती बच्छाव मॅडम, श्रीमती बागुल मॅडम, श्रीमती टोंगारे मॅडम व ज्युनिअर कॉलेज शिक्षक, शिक्षकेतर सहकारी व विद्यार्थी उपस्थित होते.
