
सिन्नर ( प्रतिनिधी )०१ जून आदिवासी ह्रदयसम्राट माजी आदिवासी विकास मंत्री माजी निसर्गवासी मधुकररावजी पिचड साहेब यांच्या ८५ व्या व डाॅ.बाबा आढाव जयंतीनिमित्त महामित्र परिवार, आद्यक्रांतिकारक राघोजी ब्रिगेड सिन्नर यांच्या वतीने त्यांना सिन्नर येथे विनम्र अभिवादन करण्यात आले.
या कार्यक्रमाची सुरुवात वंदनीय मधुकररावजी पिचड साहेब व डाॅ.बाबा आढाव यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली
या कार्यक्रमाचे अध्यक्ष महामित्र दत्ता वायचळे यांनी आपल्या मनोगत व्यक्त करताना म्हणाले की
मधुकर पिचड यांना सलग सात वेळा विधानसभेवर आमदार म्हणून अकोलेच्या जनतेने निवडून दिलं होतं. मधुकर पिचड यांची जिल्हा परिषद सदस्य म्हणून राजकारणास सुरूवात झाली होती. त्यानंतर ते अनेक खात्यांचे मंत्री राहिले. त्यांच्याकडे आदिवासी विकास खात्याची जबाबदारी प्रदीर्घ काळ राहिली. त्यांनी अकोले तालुक्याच्या पर्यटनाला चालना मिळावी याकरता अथक प्रयत्न केले. ते आदिवासी बांधवांना रोजगार मिळावा यासाठी देखील नेहमी प्रयत्नशील राहिले.अकोले तालुक्यात अनेक छोट्या धरणांची निर्मीती मधुकर पिचड यांन आदिवासी विकास मंत्री म्हणून काम केले अशा महान समाजसेवक दिवंगत मधुकरराव पिचड साहेब यांना विनम्र अभिवादन

तसेच डाॅ. बाबा आढाव हे महाराष्ट्रातील सत्यशोधक विचारांचे निष्ठावान अनुयायी आणि आयुष्यभर कष्टकरी वर्गासाठी समर्पित राहिलेले नेतृत्व होते. असंघटित आणि वंचित घटक, विशेषतः हमाल, रिक्षाचालक आणि बांधकाम मजूर, यांना न्याय, सन्मान आणि सामाजिक सुरक्षा मिळवून देण्यासाठी त्यांनी आपले संपूर्ण जीवन वेचले. त्यांचे कार्य केवळ चळवळीपुरते मर्यादित नव्हते, तर त्यांनी माणुसकी आणि समतेचे मोल जपले.त्यांच्या कार्याचा सर्वांत महत्त्वाचा टप्पा म्हणजे ‘हमाल पंचायती’ची स्थापना. या संघटनेच्या माध्यमातून त्यांनी पुणे शहरासह संपूर्ण महाराष्ट्रातील हजारो हमालांना संघटित केले आणि त्यांच्या हक्कांचे रक्षण केले. तसेच, समाजात खोलवर रुजलेल्या जातीय भेदभावाविरुद्ध त्यांनी ‘एक गाव एक पाणवठा’ या क्रांतीकारी चळवळीचे नेतृत्व केले आणि समाजात समता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला.
विजय मुठे यांना आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की आदिवासी ह्रदयसम्राट मधुकरराव पिचड साहेबांनीआदिवासींच्या विकासासाठी आदिवासींसाठी वेगळं बजेट, आदिवासी मध्ये बोगसांची घुसखोरी रोखण्यासाठी केलेला कायदा, आदिवासींच्या न्याय हक्कासाठी पेसा कायद्याची निर्मिती,आदिवासी विकास भवन, आदिवासींच्या शिक्षणासाठी आश्रमशाळांची निर्मिती, आद्यक्रांतिकारक राघोजी भांगरे यांचा व आदिवासी क्रांतिकारकांचा इतिहास पुढे आणण्याचं काम, भंडारदरा धरणाला आद्यक्रांतिकारक राघोजी भांगरे यांचं नामकरण,शेतकऱ्यांसाठी निळवंडे धरणाची निर्मिती,अगस्ती सहकारी साखर कारखाना निर्माण करण्याचं काम असे अनेक कामं मधुकररावजी पिचड साहेब यांनी केले.अशा या जलनायकास विनम्र अभिवादन!
प्रकाश शिरसाठ यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की
डाॅ.बाबा आढाव त्यांनी आपले संपूर्ण जीवन असंघटित आणि वंचित कष्टकरी हमाल, रिक्षाचालक आणि बांधकाम मजुरांचे संघटन करून त्यांना न्याय, सामाजिक सुरक्षा आणि सन्मान मिळवून देण्यासाठी काम केले. त्यांच्या कार्याचा महत्त्वाचा टप्पा म्हणजे ‘हमाल पंचायती’ची स्थापना, ज्याच्या माध्यमातून त्यांनी पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील हमालांना संघटित केले..यासोबतच, जातीय भेदभावाविरुद्ध लढण्यासाठी त्यांनी ‘एक गाव एक पाणवठा’ या क्रांतीकारी चळवळीचे नेतृत्व केले.अशा महान समाजसेवक विनम्र अभिवादन
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भूषण मोरे यांनी केले व प्रास्ताविक विजय मुठे यांनी केले तर आभार सागर खेताडे यांनी मानले
यावेळी महामित्र दत्ता वायचळे आद्य क्रांतिकारक राघोजी ब्रिगेड चे सहसंस्थापक विजय मुठे माजी नगरसेवक रुपेश भाऊ मुठे प्रकाश शिरसाठ भूषण मोरे भगवान नवाळे संदीप मुठे लखन चव्हाण किरण मुठे रोहित मुठे श्याम डांगे प्रकाश गुंजाळ आदी उपस्थित होते
