
नाशिक जिल्हा प्रतिनिधी नवनाथ गायकर-
विधानपरिषदेच्या निवडणुका या सगळया धनाच्या बल प्रयोगावर लढल्या जात असतात हे उघड सत्य असुन नाशिक विधानपरिषदेच्या निवडणुकीतही साम, दाम, दंड , भेद आदि प्रयोगाचां सर्रास वापर सुरु आहे. मात्र असे असले तरी पक्षीय उमेदवाराचे पारडे हे नेहमीच जड मानले जात असल्याने महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे यांचा विजयाचा मार्ग सुलभ असला तरी तितकाच जिकिरीचा ही आहे.
उबाठा ने अकस्मात पणे निवडणुकीतुन माघार घेतल्याने महायुतीच्या बंडखोर उमेदवारास ते समर्थन देतात कि आपल्या मतदारानां ते स्वातंत्र्य देतात हे पाहणे मनोरंजक ठरणार आहे.
महायुतीने नरेंद्र दराडे यांना दुसर्यादां संधी दिली असुन दराडे हे राजकारणातील मातब्बर खेळाडु मानले जातात.पक्षीय कार्यकर्त्यासोबतच दराडे यांची स्वत;चीही विश्वासु अशी यंत्रणा फार गाजावाजा न करता काम करत असते.
शिक्षक मतदारसंघातुन आ.किशोर दराडे दुसर्यादां आमदार झालेले आहेत, तर नरेंद्र दराडे हे ही दुसर्यादां आमदार होण्याच्या प्रयत्नात आहे.
महायुतीतच यावेळी बंडखोरी झाली असुन गीते, म्हैसधुने, बोडके आदी उमेदवार अपक्ष म्हणुन रिंगणात आहे.
मात्र दराडेचें पारडे जड दिसत असुन शेवटपर्यंत ते कशापद्धतीने नियोजन करतात हा औत्सुक्याचा विषय आहे.
या निवडणुकीच्या निमित्ताने नव्याने निवडुन आलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या मतदारानां आपला निवडणुक खर्च वसुलीची संधी मात्र हमखास आहे.
