
नाशिक जिल्हा प्रतिनिधी नवनाथ गायकर यांजकडुन –
नाशिक विधानपरिषदेच्या एका जागेसाठी महायुतीमध्ये तुंबळ लढाई सुरु असतानां दुसरीकडे महाविकास आघाडीत मात्र सन्नाटा पसरलेला आहे.संख्याबळ पुरेसे नसल्याने उगा का खाज मिटवुन घ्यायची असे खाजगीत बोलत एक एक शिलेदार रिंगण सोडत आहे.
निफाड चे माजी आमदार अँड.अनिल कदम यांचे नाव चर्चेत असले तरी, विजयाची सुतराम शक्यता नसल्याने बळीचा बकरा बनावयास कोणीही तयार नाही.
दुसरीकडे महायुतीत मात्र जोरदार रस्सीखेच सुरु आहे.
शिवसेनेचे नरेंद्र दराडे हे दुसर्यादां नशिब आजमावु पहात आहेत.
तर काही भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवारही रिंगणात उतरल्याने महायुतीतच डोकेदुखी वाढली आहे.
विधानपरिषदेच्या निवडणुका म्हंणजे सगळाच धनबलाचा खेळ असला तरी संख्याबळाअभावी विरोधी छावणीत स्मशानशांतता आहे.
