
नाशिक जिल्हा प्रतिनिधी – नवनाथ गायकर यांजकडुन –
नाशिक विधानपरिषदेच्या निवडणुक रिंगणात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश चिटणीस गोरख बोडके यांची ही एंट्री झाली आहे. या एंट्रीमुळे महायुतीत खळबळ माजली आहे.
नाशिक विधानपरिषदेच्या जागेवर भाजप व शिवसेनेने हक्क सांगितला असुन जागा शिवसेनेला दिली जाईल अशी अटकळ आहे. शिवसेनेचे माजी विधानपरिषद सदस्य आमदार नरेंद्र दराडे हे पुन्हा रिंगणात उतरणार असल्याचे निश्चित झाले आहे.
भाजप कडुन महानगरपालिकेचे माजी स्थायी सभापती गणेश गीते इच्छुक आहेत.
दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे वतीने प्रदेश चिटणीस गोरख बोडके यांनीही उमेदवारीचा दावा केल्याने महायुतीचा अधिकृत उमेदवार कोण असणार ? महायुती होणार ? कि स्वतंत्रपणे लढणार ही चर्चा सुरु झाली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस च्या स्थानिक नेत्याचीं नाराजी
नाशिक विधानपरिषदेच्या निवडणुक दरम्यान महायुतीत समन्वय नाही.घटक पक्षानां विचारात घेतले जात नाही अशी नाराजी व्यक्त केली आहे.
