
ओझर: दि.३१ वार्ताहर
येथील आरोग्य केंद्राचे निरीक्षक रविंद जिभाऊ देवरे हे एकोनतीस वर्षाच्या प्रदीर्घ सेवेतून सेवानिवृत्त झाले. त्यांचा आरोग्य सेवक पदी १९९७ मध्ये सेवेस प्रारंभ झाला. यानंतर पदोन्नती नगर जिल्ह्यात श्रीगोंदा येथे झाली.

त्र्यंबकेश्वर आंबोली ओझर येथे रुग्णसेवा केली. कोरोना साथीत योद्धा म्हणून काम केले. साथीच्या काळात हर घर गप्पी मासे मोहीम राबविण्यात येऊन साथीवर प्रतिकार करण्यात यशस्वी झाले. सेवापूर्ती निमित्त निफाड तालुका आरोग्य अधिकारी डॉ कोशिरे, कार्यक्रमाचे अध्यक्ष पिंपळगाव ब चे वैद्यकीय अधिकारी डॉ वैशाली कदम, डॉ योगेश धनवटे, आरोग्य सहायक मन्सूरी, सानप, डॉ चव्हाण, वैद्यकीय अधिकारी डॉ आनंद सुर्वे, डॉ प्राची पवार, डॉ मंजिरी सराफ, आपला दवाखाना वैद्यकीय अधिकारी डॉ रिद्धी पाटील, राजेंद्र बोरसे, सुयोग शेटे, संध्याताई, भामरेताई, सिस्टर जाधव, गरुड, सोनाली, हिवताप कर्मचारी संघटनेचे संजय राव, हिवताप कर्मचारी पतसंस्था संचालिका पल्लवी कुलकर्णी, आरोग्य सेवक प्रवीण राऊत, आशा चैताली कावळे, गटप्रवर्तक कावेरी कदम, संगीता गाडे, आरोग्य कर्मचारी आशा यांनी मनोगत, आदर भाव व्यक्त करून सेवानिवृत्तीच्या शुभेच्छा दिल्या.
