
नाशिक जिल्हा प्रतिनिधी – नवनाथ गायकर यांजकडुन
सध्या स्मार्ट प्रिपेड वीज मिटर वीज वितरण कडुन घरगुती ग्राहकाच्यां माथी थोपली गेली असुन याद्वारे नेहमी आकारल्या जाणार्या बिलापेक्षाही अव्वाच्या सव्वा बिले आकारली जात असुन यामुळे ग्राहक त्रस्त झाले आहेत. यामुळे वीज नको पण बिल आवर असे म्हणण्याची पाळी ग्राहकांवर आली असुन हेच का भाजप,शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसचे महायुती सरकारचे अच्छे दिन ? असा सवाल नागरिक करत आहेत.
यातच ग्रामीण भागात वांरवार वीजपुरवठा खंडित केला जात असुन आधीच उकाडयाने हैरान झालेल्या नागरिकाच्यां मनस्तापात व संतापात भर घातली जात आहे.
प्रिप्रेड वीज मिटर मुळे बँलन्स संपला की वीज पुरवठा तात्काळ खंडित केला जातो आहे. यात कुठलीही सवलत ग्राहकानां मिळत नसल्याने पैसे असले तरच वीज वापर अन्यथा बैस अंधारात अशी स्थिती ग्राहकांवर ओढावली असुन मुकी बिचारी, कुणीही हाका या उक्तीप्रमाणे कुठेही दाद ना फिर्याद , झक मारुन पहिले बिल भरा अशी केविलवाणी वेळ नागरिकावर आली आहे.पुर्वी किमान तीन महिन्याने बिल यायचे ते आता दरमहा येत असुन त्यातही पुर्वी येणार्या वीज बिलाचे चार चार पटीने बिल आकारणी सुरु असल्याने ग्राहक संतप्त झाले आहेत.
रेशनवर आता तब्बल ८० ते ९० रुपये लिटरने रॉकेल मिळण्यास प्रारंभ झाला असुन पुन्हा अकदा या दरवाढीने त्रस्त नागरिक चला अंधारयुगाकडे असे म्हणतो आहे.
