
ओझर (वार्ताहर) येथील पोद्दार इंटरनॅशनल स्कूलचा विद्यार्थी ऋग्वेद प्रभाकर लवांड, इ.आठवी याने वयाच्या तेराव्या वर्षी ‘द सीक्रेट ऑफ हिडन वर्ल्ड’ हे रहस्यमय पस्तीस पानी पुस्तक इंग्रजीतून लिहिले. पुस्तक प्रकाशन प्रसंगी खासदार भास्करराव भगरे यांनी ऋग्वेदचे कौतुक करून अभिनंदन केले. अध्यक्षीय भाषणात खासदार भगरे यांनी ऋग्वेदने लिहिलेले पुस्तक हे बतीस देशांमध्ये प्रकाशित होतील. ब्री बुक या प्रकाशनाचे एक लाख चाळीस हजारापेक्षाही जास्त लेखक या प्रकाशनात सहभागी झाले असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी प्रमुख अतिथी महामंडलेश्वर १००८ श्री श्री शिवगिरीजी महाराज यांनी शुभेच्छा व आशीर्वाद दिले.

याप्रसंगी खेडगावचे कृषीभूषण माणिकराव अण्णा पाटील पिंपळगावचे नगरसेवक भास्करराव बनकर, गणेश बनकर, महेश अहिरे, हर्षल जाधव, विशाल मोरे, दीपक विधाते, डॉ रोहन मोरे, डॉ सुधीर भांबर, बी.पी पाटील, कॉलेजचे संचालक प्रा दिनेश अनारसे, शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा सुनील वाघ, किशोर महाले, मनोज शेळके, दीपक अहिरे, दत्तू जाधव, केशव बनकर, संपतराव आथरे, ज्ञानसागर क्लासेसचे भाऊसाहेब कुशारे आदी मान्यवर उपस्थित होते. ऋग्वेद हा माधवराव बोरस्ते हायस्कूलचे क्रीडा शिक्षक प्रभाकर लवांड, कलाशिक्षिका सविता पवार या दांपत्याचा पाल्य आहे. सूत्रसंचालन मुकुंद ताकाटे यांनी केले. आभार एन डी एस टी संचालक समीर जाधव यांनी मानले.
