
सोहम सतिष शेवाळे
ओझर: ( वार्ताहर)येथील ‘मविप्र’ समाज संस्थेच्या माधवराव बोरस्ते विद्यालयाच्या सोहम सतीश शेवाळे या विद्यार्थ्याने केंद्रीय शिक्षण मंत्रालयातर्फे चालविल्या जाणाऱ्या नवोदय या परिक्षेत घवघवीत यश संपादन करीत ही जागा पटकावली आहे. नवोदय विद्यालय समिती मार्फत घेण्यात येणारी ही परीक्षा अत्यंत कठीण व कमी जागा असल्याने चुरशीची मानली जाते. मराठी माध्यमातून शिकत असतानाही परिश्रम, सातत्य आणि शिक्षकांच्या योग्य मार्गदर्शनाने विद्यार्थी स्वतःचे भविष्य उज्वल करू शकतात,असे प्रतिपादन शाळेचे मुख्याध्यापक सोपान वाटपाडे यांनी अभिनंदन करताना केले. सोहमने आर.एम. एस.ऑलिंम्पियाड, बी.डी.एस.या स्पर्धा परीक्षांमध्ये देखील चांगले यश संपादन केले आहे. सोहमला शाळेचे मुख्याध्यापक सोपान वाटपाडे , शिक्षिका सौ.व्ही बी शिंदे, श्रीम. मंगल सावंत, श्री.नरेंद्र डेर्ले यांचे मार्गदर्शन लाभले.
