
नाशिक जिल्हा प्रतिनिधी – नवनाथ गायकर यांजकडुन –
राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा दिवंगत उपमुख्यमंत्री कै.अजित पवार यांचे अपघाती निधनाचे पाश्वर्भुमिवर इगतपुरी- त्रंबकेश्वर मतदार संघाचे आमदार हिरामण खोसकर यांनी आपला वाढदिवस साजरा न करण्याचे ठरवले आहे.
कै.अजित पवार हे केवळ राष्ट्रवादी काँग्रेसचेच नव्हे तर संपुर्ण महाराष्ट्राचेच लाडके नेते होते.त्यांनी पक्षाचे नेते, आमदार, खासदार व कार्यकर्त्यांवर मनापासुन प्रेम केले होता.असा उमदा नेता आकस्मिकपणे गेल्याने संपुर्ण महाराष्ट्रावर दु;खाचा डोंगर कोसळला आहे.
या पाश्वर्भुमिवर इगतपुरी- त्रंबकेश्वर विधानसभा मतदार संघाचे आमदार हिरामण खोसकर यांनी येत्या १ जुन रोजी असणारा त्यांचा नियोजित वाढदिवस रद्द केला आहे.
