
नाशिक जिल्हा प्रतिनिधी – नवनाथ गायकर यांजकडुन –
इगतपुरी तालुक्यातील मुकणे धरण प्रकल्प बाधीत अल्प भु धारक शेतकरी कुटुंबातील कु.मयुरी अशोक राव या मुलीने जिद्द व परिश्रमाचे बळावर, आई वडिल व शिक्षक यांचे पाठिंब्यावर मुंबई पोलीस दलात भरती प्रक्रियेत सुयश मिळवले आहे. कु. मयुरी ही मुकणे गावातील पहिली महिला पोलीस कर्मचारी बनली आहे.
मुकणे हे गाव प्रकल्पबाधिताचें गाव म्हणुन ओळखले जाते.या गावातील शेकडो हेक्टर सुपिक जमिनी धरणात गेल्याने अनेक कुटुंबे विस्थापीत झाली आहेत.अल्प भु धारक बनली आहेत.
अशोक कचरु राव यांचे कुटुंबही मुकणे धरणाने बाधित झालेले आहे.
याच कुटुंबातील अशोक राव यांच्या मुलीने कु. मयुरीने जिद्द व परिश्रमाचे बळावर अथक मेहनतीतुन मुंबई पोलीस दलात दाखल होत सुयश मिळवले आहे.
तिच्या या यशाने आई वडिल, शिक्षक, कुटुंबाचा , गावाचा व परिसरातील नागरिकाचां ऊर भरुन आला असुन प्रत्यक्ष व सोशल मिडीयावर कु मयुरीचे अभिनंदन केले जात आहे.
आई वडिलाचें स्वप्न साकार – कु.मयुरी
आई वडिल व शिक्षकानीं प्रेरणा दिली.जिद्द व बळ दिले.त्यामुळेच आजचे हे सुयश मिळवले गेले आहे.
लक्ष्मीच्या लेकीने मान उंचावली- वडिल अशोक राव
मुलगी ही धनाची पेटी मानली जाते. या लक्ष्मीने आमचे कुटुंब, गाव परिसराची मान व शान उंचावली आहे.
वडिल अशोक कचरु राव
