
नाशिक ( प्रतिनिधी).महाराष्ट्र राज्य गिरजा महिला मंचच्या नवनिर्वाचित पदाधिकारी ची महत्वाची बैठक कुसुमाग्रजांच्या शिरवाडे वणी अर्थात पुस्तकाच्या गावात संपन्न झाली.महिलांसाठी एक हक्काचे व्यासपीठ गिरणा गौरव प्रतिष्ठान तर्फे निर्माण केले असून त्या अंतर्गत महाराष्ट्र राज्य गिरजा महिला मंच या महिलांसाठी स्वतंत्र्य व्यासपीठाची निर्मिती करण्यात आली. महिलांसाठी साहित्य, सांस्कृतिक, सामाजिक ,बचत,आरोग्य अशा विविध अशा विविध उपक्रमातून महिलांना स्वतंत्र व्यासपीठ निर्माण करून समृद्ध परिवार निर्माण करण्याचे स्वप्न बाळगणाऱ्या गिरणा गौरव प्रतिष्ठान संचलित महाराष्ट्र राज्य गिरजा महिला मंचच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक राष्ट्रीय अध्यक्ष प्रतिभा म्हस्के यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.यावेळी राष्ट्रीय सरचिटणीस भारती निकम, जिल्हा अध्यक्ष शितल कुयटे,जिल्हा उपाध्यक्ष भाग्यश्री चौधरी,सचिव माधुरी भावनाथ,कार्याध्यक्ष पुजा दंडगव्हाळ यांचा निवडीबद्दल सत्कार करण्यात आला.यावेळी निफाड तालुका कार्याध्यक्ष पदी कवियत्री वैशाली शिंदे यांची तसेच कांचनमाला हुजरे यांची तालुका सचिव पदी निवड करण्यात आली. जिल्हाध्यक्ष शितल कुयटे यांनी निवडीबद्दल त्यांचा सन्मान केला.गिरजा महिला मंच अधिक समृद्ध करून महिलांचे संघटन करून स्वतंत्र्य व्यासपीठाची जनजागृती करण्यासाठी शहरापासुन तर गाव पातळीवर विशेष अभियान जनजागृती करण्याची गरज असल्याचे मत यावेळी येवला तालुका अध्यक्ष पूनम वाघमोडे यांनी केले.गिरजा महिला मंचने आम्हाला एक वेगळी ओळख निर्माण करून दिली. त्यामुळे गिरणा परिवार अधिक समृद्ध करण्यासाठी आम्ही नेहमी कटीबद्ध राहू असा विश्वास यावेळी निफाड तालुका अध्यक्ष कल्पना माने यांनी व्यक्त केला.पदाधिकाऱ्यांच्या महत्त्वपूर्ण बैठकीत महिलांचे संघटन वाढण्यासाठी तसेच जिल्हा पातळीवर प्रत्येक तालुका निहाय अध्यक्षांची निवड करून कार्यकारणी तयार करण्यासाठी तसेच राज्यभरात प्रत्येक जिल्ह्यात महाराष्ट्र राज्य गिरजा महिलांचे कार्यकारणी व अध्यक्ष निवडून विविध कार्यक्रमाचे नियोजन करण्यासंदर्भात विचार विनिमय करण्यात आला. जास्तीत जास्त महिलांना सभासद करून समृद्ध परिवार अधिक बळकट करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याची गरज असल्याचेही सांगितले विद्यार्थीनी गुणगौरव सोहळा, रक्षाबंधन, शहीद दिन, आरोग्य शिबिर ,शेकोटी लोककला साहित्य संमेलन, गिरणा गौरव पुरस्कार, मातृदिन पावसाळी सहल, विद्यार्थी मार्गदर्शन, सरपंच परिषद,कवीसंमेलन अशा विविध वर्षभरात होणाऱ्या कार्यक्रमांवर चर्चा करण्यात आली. आपल्यातील मतभेद बाजूला करून आपण समाजसेवक अहोत हि भावना जाणून काम करा अशा सुचना भारती निकम यांनी दिल्या.आपल्यातील संवाद कमी होऊ न देता सातत्य आपल्या कार्यात असावे आपले पद आपली महत्वाची जबाबदारी आहे. त्या पदाला पात्र राहुन काम केले पाहिजे असे मत भाग्यश्री चौधरी यांनी व्यक्त केले. जिल्ह्यातील प्रत्येक तालुका स्तरांवर संघटन करण्यासाठी आपण कटीबद्ध राहु असा विश्वास जिल्हाध्यक्ष शितल कुयटे यांनी व्यक्त केला. सभासदांना ड्रेस कोड ठरवून दिला तर महिला मध्ये समज गैरसमज होणार नाही यासाठी ड्रेस कोडवर पुजा दंडगव्हाळ यांनी विषय मांडला. आपल्याला आपल्या पदाला जे काम आहे. ते तत्पर राहून बिनदिक्कत पणे पूर्ण करण्याची ग्वाही जिल्हा सचिव माधुरी भावनाथ यांनी दिली. राष्ट्रीय पद हे मोठे असून मी न्याय देऊ शकेल का या मनस्थितीत असतानां मला जिल्हाभरातील भगीनीनी उमेद दिली. त्या उमेदीमुळे हे पद मी स्विकारले या पदाचा उपयोग राज्यभर संघटन आणि समृद्ध परिवार निर्माण करण्यासाठी मी नक्कीच न्याय देईल असा विश्वासही यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष प्रतिभा म्हस्के यांनी व्यक्त केला. वैशाली शिंदे यांनी सुत्रसंचालन केले तर आभार कांचनमाला हुजरे यांनी मानले.
