
*गझलवृत्त :- मेनका*
📚 *माझे ज्योतिबा*
ज्ञानियाचे द्वार माझे ज्योतिबा कर्मठांवर वार माझे ज्योतिबा
पुस्तकांनी मस्तकांना जोडलेअक्षरांची धार माझे ज्योतिबा
अंधश्रद्धा कर्मकांडे रोखलेशक्तिशाली पार माझे ज्योतिबा
सावकारी वादळांशी झुंजलेसागराचा क्षार माझे ज्योतिबा
विश्वव्यापी लेख त्यांचे गाजलेलेखनीचे स्वार माझे ज्योतिबा
जीवनी शिवराय दैवत मानलेकर्मयोगी फार माझे ज्योतिबा
बालिकांना ज्ञान अमृत पाजलेशब्दपुष्पी हार माझे ज्योतिबा
देव ऐैसा ‘देवदत्ता’ वंदितोजीवनाचे सार माझे ज्योतिबा
✍🏼 सुगंधानुज..✍🏼 (देवदत्त बोरसे) मुख्याध्यापक..मा.श्री.श.प.माध्य.विद्यालय*
निगडोळ ता.दिंडोरी जि.नाशिक.मो.नं.९४२१५०१६९५.
