
नाशिक:( प्रतिनिधी)- ज्येष्ठ नागरिक यांचा सहवास म्हणजे आनंदाचा शिडकावा असतो. ज्येष्ठ नागरिक संघाच्या माध्यमातून समाजोपयोगी आणि विविधांगी उपक्रम राबवणाऱ्या द्वारका परिसर ज्येष्ठ नागरिक संघाचे कार्य म्हणूनच अभिमानास्पद आहे, असे उदगार नाशिक मध्यच्या आमदार प्रा.देवयानी फरांदे यांनी काढले. द्वारका परिसर जेष्ठ नागरिक संघाच्या रौप्यमहोत्सवानिमित्त आयोजित सोहळ्यात त्या प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या. कार्यक्रमात संस्थापक अध्यक्ष भास्करराव पुंडे यांचा कृतज्ञतापूर्वक सन्मान करण्यात आला. महाराष्ट्र फेस्कॉमचे अध्यक्ष अशोकनाना होळकर, प्रभाग १५चे नगरसेवक सचिन मराठे, प्रथमेश गिते, सीमा पवार यांच्यासह विशाल पवार, भाजपा ओबीसी सेलचे अध्यक्ष शंतनू शिंदे यांसह अनेक मान्यवर आणि संस्थेचे सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. संघाचे अध्यक्ष ॲड.पी.डी.काळे यांनी संस्थेच्या २५ वर्षाच्या वाटचालीचा अहवाल सादर केला. उपाध्यक्ष धनंजय चतुर, कार्याध्यक्ष मारुती तांबे, सचिव अंबादास बुराडे, खजिनदार जे.बी.घिया, सहसचिव मिलिंद कुलकर्णी, सहकोषाध्यक्ष शुक्ला, मधुकर कोटकर, ग्रंथपाल शशिकांत उपासनी यांसह सर्व पदाधिकारी आणि सभासद यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.
