
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित ३२७८ वा दिवस
ईश्वर आपल्याला निर्माण करतो आणि आपण ईश्वराला. हीच माया आहे. सर्वत्र हे अखंड वर्तुळ निदर्शनास येते. मन देह निर्माण करतो आणि देह मन. अंड्यातून कोंबडी निपचते आणि कोंबडीतून अंडे, झाडापासून बी आणि परत बी पासून झाड हा जगत्प्रपंच पूर्णपणे भेदयुक्तही नाही आणि पूर्णपणे अभेदमयही नाही, तो पूर्णपणे बहुजनसी पण नाही आणि एकजिनसीही नाही. मानव हा स्वाधीन आहे, स्वतंत्र आहे. त्याने या दोन्ही भावांच्या वर जावयास हवे या दोन्ही बाजू उल्लंघून जावयास हवे. या दोन्ही बाजू आपापल्या पक्षी खऱ्या आहेत; परंतु ते यथार्थ सत्य ते अस्ती स्वरूप गाठावयाचे झाल्यास, आपण आज ज्याला अस्तित्व, इच्छाशक्ती, जाणीव, करणे, जाणे, जाणणे वगैरे समजतो त्या साऱ्यांच्या पलीकडे आपल्याला जावे लागेल, त्या सगळ्यांच्या आतीत जावे लागेल. जीवात्म्याला खरेखुरे व्यक्तित्व नाही तो एक मिश्र वस्तू आहे, आणि म्हणून कालांतराने त्याचे तुकडे तुकडे होऊन तो नाश पावेल. जिचे आणखी कोणत्याही प्रकारे विश्लेषण वा पृथक्करण करता येत नाही, फक्त तीच वस्तू अमिश्र असते, आणि केवळ तीच सत्यस्वरूप मुक्तस्वभाव अमर आनंदरूप असते.
*स्वामी विवेकानंद...*
●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●
★ भारतीय सौर जेष्ठ /शुक्रमास १ शके १९४८
★ जेष्ठ अधिक शुध्द /शुक्ल ६/७
★ शालिवाहन शके १९४८
★ शिवशक ३५१
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ विक्रम (रौद्र) संवत्सर २०८३
★ शुक्रवार दि. २२ मे २०२६
★ १७७२ सतीबंदीचा कायदा पारीत करुन घेणारे, आधुनिक भारताचे जनक, थोर समाजसुधारक राजाराम मोहनराय यांचा जन्मदिन.
★ १९९१ भारतीय कामगार संघटनेचे नेते, साम्यवादी पक्षाचे जेष्ठ नेते श्रीपाद अमृत डांगे यांचा स्मृतीदिन..
★ जागतिक जैवविविधता दिन.
संकलन – प्रा. अमोल श्रीकृष्ण अहिरे, नाशिक
