
नाशिक( प्रतिनिधी):- इंदिरानगर येथील कृतार्थ ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने स्वानंद ज्येष्ठ नागरिक संस्थेच्या महिला सभासदांनी सादर केलेल्या आपल्या समृद्ध सांस्कृतिक आणि अध्यात्मिक परंपरेचा वारसा उलगडणाऱ्या “संत साहित्यातील स्त्री व्यक्तिरेखांच्या नाट्याभिनयाने ज्येष्ठ नागरिकांची मने जिंकली. संत गोणाई-वैदेही कुलकर्णी, संत जनाबाई-मृणाल प्रभुणे, संत मुक्ताई-सुनंदा गोसावी, संत सोयराबाई-ज्योती जोशी, संत कान्होपात्रा-मनीषा जोशी, संत बहिणाबाई-मेखला रास्वळकर, संत भागुबाई-दीपाली भिंगारकर, संत विठाबाई-शोभना व्यवहारे, संत राजाई-सुधा कुलकर्णी, संत वेण्णाबाई-साधना शिरसाट, संत लढाई-शैलजा कुलकर्णी, संत मीराबाई-रेखा नाशिककर, संत सखुबाई-विणा जोशी, संत प्रेमाबाई-सुप्रिया बनसोड या महिला कलाकारांनी संतसाहित्यातील स्त्री व्यक्तिरेखांचा जीवनक्रम सादर केला. विठ्ठलाची भूमिका मंदाकिनी मुदलीयार यांनी केली तर अभंग रजनी जोशी यांनी सादर केले. नाट्यात्मक संगीताची, अभंगाची साथ मिळाल्याने एक वेगळीच उंची कार्यक्रमाला प्राप्त झाली. सूत्रसंचालन कल्पना वैद्य यांनी केले. सभासदांना वाढदिवसानिमित्त संघाचे अध्यक्ष वासुदेव पांडे यांनी शुभेच्छा देत संत साहित्यातील व्यक्तिरेखा सादर करणाऱ्या महिला सभासदांचा विशेष उल्लेख करत गौरवोद्गार काढले. उपाध्यक्ष दिनकर कुलकर्णी, सचिव दत्तात्रय जोशी, दिनकर कुलकर्णी, रमेश देसाई, अनंद तडवळकर, कोषाध्यक्ष प्रवीणकुमार गीत, विनायक ठोंबरे, गीता पोळ, निलिमा जोशी, रंजना जोशी, मंदाकिनी मुदलियार, संजय चंद्रमोरे, दिलीप भिंगारकर, अविनाश गोसावी यांनी विशेष परिश्रम घेतले. सांगता पसायदानाने झाली.
