
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित ३२७४ वा दिवस
ज्ञान कधी निर्माण करता येत नसते ते केवळ शोधून काढता येणे शक्य आहे. आणि जी कुणी व्यक्ती असला एखादा मोठा शोध लावते तिला अंतःस्फूर्ती लाभलेली व्यक्ती म्हणता येईल. फक्त तिने जर आध्यात्मिक सध्याचा शोध लावला तर आपण तिला ऋषी वा अवतार म्हणतो आणि तो शोध जर जडजगतातील एखाद्या सत्याचा असेल तर त्या व्यक्तीला आपण वैज्ञानिक म्हणत असतो. ते एकच ब्रह्म असले तरी आपण पहिल्या कोट्यातील व्यक्तींना अधिक महत्त्व देत असतो. अधिक सन्मान देत असतो. ज्ञान हे केवळ सत्याद्वारेच लाभत असते. पुण्यकृत्यांनी व शुभ कर्माने ज्ञानावरील आवरण दूर होते आणि केवळ ज्ञानाद्वारेच ईश्वराचे दर्शन होत असते.
स्वामी विवेकानंद...
●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●
★ भारतीय सौर वैशाख/माधवमास २८ शके १९४८
★ जेष्ठ अधिक शुध्द /शुक्ल २
★ शालिवाहन शके १९४८
★ शिवशक ३५१
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ विक्रम (रौद्र) संवत्सर २०८३
★ सोमवार दि. १८ मे २०२६
★ १४९८ पोर्तुगीज खलाशी वास्को -द- गामा भारताच्या कालीकत बंदरात दाखल झाला.
★ १८४६ मराठी भाषेतील आद्य पत्रकार, “दर्पणकार” आचार्य बाळशास्त्री गंगाधरशास्त्री जांभेकर यांचा स्मृतीदिन
★ १९७४ भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांच्या उपस्थितीत पोखरण येथे आण्विक अस्त्राची पहिली यशस्वी चाचणी झाली.
★ जागतिक संग्राहलय दिन.
संकलन – प्रा. अमोल श्रीकृष्ण अहिरे, नाशिक
