
व्यक्तिविशेष लेख – नवनाथ गायकर
इगतपुरी तालुक्यातील डोंगर दरीत वसलेलं अतिदुर्गम व नकाशावर ही नसलेलं गाव म्हंणजे मोडाळे.या मागास गावात गोरख बोडके यांचा जन्म एका साधारण शेतकरी कुटुंबात झाला.
घरची परिस्थिती गरिबीची होती.त्यामुळे शिक्षणासाठी बाहेर पडल्यानंतर घर,कुटुंब व गावासाठी काही तरी करायचं ही तळमळ पहिल्यापासुनच होती.
स्वभाव मुळातच चळवळया असल्याने ते शांत बसत नव्हते. स्वाध्याय परिवाराशी जोडले गेल्याने लहानपणीच आध्यात्मिक संस्कार त्यांच्यावर झाले होते.
शिक्षण झाल्यानंतर कोरडवाहु शेतीवर उदरनिर्वाह शक्य नसल्याने वाडिवर्हे येथे वास्तव्य करुन त्यांनी औदयोगिक वसाहत गोंदे दुमाला येथील खाजगी कंपनीत कामगार म्हणुन काम सुरु केले.पण तिथेही ते गप्प बसले नाहीत. परिसरातील धरणग्रस्त व अल्प भुधारक मुलानां पर्याय नसल्याने कंपनीत कामे करावी लागत असे.पण तिथे त्यांचे मोठया प्रमाणावर शोषण होत होते.

या विरुद्ध बोडके यांनी आवाज उठवला.पण परिणाम त्यांना कामावरुन काढुन टाकण्यात आहे.
लढाऊ वृत्तीच्या बोडकेनीं हार न मानता समस्त कंपनी मधील चालणार्या अन्यायाविरुद्ध त्यांनी संघर्ष सुरु केला.
नांदगावचे विदयमान आमदार सुहास कांदे यांचे संपर्कात येऊन बोडकेनीं लढा दिला आणि अनेक कामगारानां न्याय मिळवुन दिला.
याच काळात पत्रकार म्हणुनही त्यांनी काम केले. तिथेही त्यांनी भल्या भल्या राजकारण्याचें वाभाडे काढले.
पुढे शिरसाटे जि.प.गटातुन निवडणुक लढवत प्रस्थापितानां पराभुत करण्याचा पराक्रम त्यांनी केला.
सुरगाणा तालुक्यातुन जि.प
ची निवडणुक लढवत राजघराण्यातील व्यक्तीस पराभुत करण्याचा पराक्रम बोडकेनीं केला.
मोडाळे या माय भु चा कायापालट करत थेट आदर्श गावाचा राष्ट्रिय पातळीवरिल सन्मान बोडकेनीं मिळवला.गावात राज्यपाल , मंत्री यांना आणुन गाव हायटेक केले.देशात या गावाचा नाव लौकिक केला.
नुसते मोडाळेच नाही तर शिरलाटे, कावनई, कर्होळे, आवळी, कुशेगाव आदी गावानांही बोडकेचां परिसस्पर्श होऊन ही गावे विकसीत झाली आहेत.
हाकेला ओ देणारा नेता आणि कुणीही कसलेही काम सांगितले तर करणारा लोकप्रिय नेता असा बोडके यांचा लौकिक आहे.
आमदार हिरामण खोसकर यांना दोनदा निवडुन आणण्यात बोडकेचां सिंहाचा वाटा आहे.
पायाला भिंगरी लावुन समाजासाठी सदैव तत्पर नेत्यास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
लेखक नवनाथ अर्जुन पाटिल गायकर
