
🎂आजचे वाढदिवस🎂


सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित ३२७३ वा दिवस
भगवान आणि त्यांचे निस्वार्थ भक्त हे दोन्ही एकच आहेत ते अगदी अभिन्न आहेत. अशा भक्तांनी जेथे निवास केलेला असतो, जेथे संचार केलेला असतो ती जागा अतिशय पवित्र असते. ते स्थान त्यांच्या देहातून निघणाऱ्या पवित्र शक्ती स्पंदनांनी भरून जाते. जे कोणी तेथे जातात त्यांना त्या स्पंदनांचा अनुभव येतो. तेथील त्या पवित्र भावाचा संचार त्यांच्यात देखील होतो. असल्या निस्वार्थ भक्तांमध्ये जात, धर्म, वर्ण, विद्या, रूप, कुळ, धन, व्यवसाय आदी प्रवृत्तीने कुठलाही भेद नसतो. ते सगळे प्रभूची लेकरे असतात. 'मी आणि माझे' चा संपूर्णपणे त्याग करा. अलम दुनियेत ज्याला माझे म्हणायचे काही नसते भगवान त्याचेच होतात, त्यालाच पावतात. आळस सोडा आणि माझे काय होईल, कसे होईल ही चिंता अजिबात करू नका. भगवंताला समर्पित होऊन आपले कर्म निस्वार्थपणे करत रहा. त्याच्या फलाचा विचार मनातही आणू नका. खरे प्रेम, खरी भक्ती ही अहेतुक असते तिच्यात कामनेची भेसळ नसते. ती नित्य नवीन असते, ती प्रतिक्षण वाढत जाते.
स्वामी विवेकानंद...
आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●
★ भारतीय सौर वैशाख/माधवमास २७ शके १९४८
★ जेष्ठ अधिक शुध्द /शुक्ल १
★ शालिवाहन शके १९४८
★ शिवशक ३५१
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ विक्रम (रौद्र) संवत्सर २०८३
★ रविवार दि. १७ मे २०२६
★ पुरुषोत्तम मासारंभ
★ १८६५ सुलतानशाही पासून ब्रिटिश अमदानीपर्यंतचा महाराष्ट्राचा इतिहास लिहीणारे इतिहासकार रियासतकार गोविंद सखाराम सरदेसाई यांचा जन्मदिन.
★ जागतिक दूरसंचार दिन
★ जागतिक उच्च रक्तदाब दिन
★ जागतिक माहिती संस्था दिन.
