
नाशिक दिनांक १६ जानेवारी :- श्री छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रीय स्मारक समिती, नवी दिल्ली, रामभूमी बहूउद्देशीय मंडळ स्व. उत्तमराव ढिकले स्पोर्ट्स फौंडेशन आणि डी.एस. एफ. , नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने दर वर्षीप्रमाणे राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिम्मित नाशिकमधील विविध खेळामध्ये राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय स्तरावर प्राविण्य मिळविणाऱ्या खेळाडूंच्या मातांच्या गौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमामध्ये विविध खेळामध्ये आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय स्तरावर उत्तम कामगिरी करणाऱ्या १०९ खेळाडूंच्या मातांना सन्मानित करण्यात आले.

या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले भिवंडी महानगरपालिकेचे मा. आयुक्त देविदास पवार, सामाजिक कार्यकर्ते गंगाधर पोखरकर, परभणीचे सुशील देशमुख यांच्या हस्ते आणि , क्रीडा संघटक नाशिक महानगरपालिकेचे नगरसेवक श्रीमती सरिता सोनावणे, आई फौंडेशनचे चेअरमन शंकर हिरे, छत्रपती पुरस्कार प्राप्त आणि या कार्यक्रमाचे प्रमुख आयोजक अशोक दुधारे, राजू शिंदे, क्रीडा संघटक दीपक निकम यांच्या प्रमुख उपस्थितीत या सर्व कर्तबगार मातांना आकर्षक चषक, सन्मानपत्र आणि कॅलेंडर प्रदान करून सन्मानित करण्यात आले.

यावेळी बोलतांना मा. आयुक्त देविदास पवार यांनी सांगितले की १६०० व्या शतकात राजमाता जिजाऊ यांनी दूरदृष्टी ठेवून जिद्दीने आपल्या सर्वांचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना घडवले. आणि छत्रपतीं शिवाजी महाराजांनी महाराष्ट्र आणि देश घडवला. याचप्रमाणे राजमाता जिजाऊ यांचा आदर्श घेऊन आजच्या या खेळाडूंच्या माताचा आपल्या मुलांना घडवण्यात आणि पर्यायाने सुदृढ समाज घडविण्यात मोलाचा वाटा आहे. त्यामुळे यांचा सन्मान करणे हा अत्यंत स्तुत्य उपक्रम आहे असे सांगितले. सत्कारार्थी मतांमध्ये चैताली जगोटा, श्रद्धा शेटकर, नीलांबरी केळकर, ज्योती पवार, स्वप्नाली सुळे, प्रसन्न डेर्ले, ज्योस्ना म्हस्के, माधवी हेकरे, स्नेहल पाटील, प्रियांका यादव, राजेश्री केंद्रे, सुरेख तारळे, सुनीता डेर्ले, सूचित पवार, वैशाली पाटील, सुजाता कुंभार, तपस्वी पाटील, अदिती पाटील, वैशाली पाटील, रुपाली ओंबळे, छाया पाटील, सुनीता साळुंके, सोनाली खोखले, प्रमोद पाटील, प्रिया केसरकर, कविता हिरे, समता जैन, शुबंगी पारीख , प्राजक्ता ताजणे, योगिता सुचे, सुवर्ण वाघ, अनुपमा डेर्ले, भरती हंस, उषा तांदळे, विशाखा जहागीरदार, सीमंतिनी नाईक, रत्ना आहेर, नीलिमा बागुल, कल्पना निकम, विमाप पवार, सुनीता जोशी, डॉ. ममता वाळेकर, स्वप्नाली पाटोळे, उषा घुगे, उज्वला फडोळ, मनीषा तांभोरे, अनिता सोनावणे, प्रीती बिजू, वैशाली सांगळे, श्रद्धा कुलकर्णी, प्रांजली वानखडे, जयश्री जोगदंड, भाग्यश्री पगारे, सारला निकम, शामबाई बोरसे, पूनम दळवी, रुपाली शिंदे, रुपाली गायधनी, कल्पना रौंदळ, रेखा दळवी, जोस्ना विश्वकर्मा, सुजाता भाविक, शिल्पा आढाव, योगिता गायकवाड, कविता मराठे, दीपाली रोडे, छाया सोळंकी, ललिता नेवसे, स्नेहल सोमाणी, चंचल रोकडे, मनीषा चव्हाणके, निलोफर शेख, फरहाद पठाण, जयश्री कोटनाके, प्रियांका शर्मा, प्रियांका साहू, भरती पवार, अशा चौधरी, दीपमाला भावसार, स्वाती डुंबल, प्रतिमा देवाडिगा, सरोजिनी राजपूत, मंजुषा भामरे, पूनम टोणपे, मनोरमा यादव, वैशाली सातभाई, जयश्री गटकळ, मीनाक्षी दबडे, दीपा प्रदीप, कविता निकम, सुनीता चौधरी, कंठी परीमाला, वैशाली पवार, जयश्री वाघ, वैशाली पाटील, विभा बोरीकर, सपना पवार, ज्योती वाडवे, भावना लखदीवे, रेश्मा बनसोडे, कविता निकम, सुनीता चौधरी, मधुरो कदम, प्रियांका भुजबळ,रुपाली महाले, ममता घरटे, ज्योती महाल, हिना शेख, शर्मीन शेख, ईश्वरी तारगे, पूर्वा सुराडे, अनुष्का अभंग, अनुष्का घोलप, अँड. सुमित्रा ओगले-देवकाते, उज्वला पाटील, इंदिरा काजला, सरोज सहानी, सुरेखा मोरे, मिश्का चोपडा, वंदना राठोड, रोमिता जोशी, सोनाली खोकले, माहिन शेख या खेळाडूंच्या मातांचा समावेश होता. यावेळी गंगाधर पोखरकर यांनीही खेळाडूं आणि त्यांच्या मातांच्या कार्याचे कौतुक केले. खेळाडूंच्या मातांच्या वतीने अनुपमा डेर्ले यांनी या कार्यक्रमाबद्दल आयोजकांना धन्यवाद दिले. प्रस्थाविक अशोक दुधारे यांनी केले, यादी वाचन कुणाल अहिरे यांनी केले तर आभार प्रदर्शन अशोक कदम यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अविनाश वाघ, मनोज म्हस्के, अंकुश सिंघ, ज्योती निकम आणि सहकारी यांनी परिश्रम घेतले.
