
नाशिक (प्रतिनिधी ) वस्तू वास्तु संस्कृतीची विविधता समजुन घेण्यासाठी जन जीवनाचा परिचय करुन घेण्याची जिज्ञासा प्रवास वर्णनातुन कळते असे प्रतिपादन अनंत वाणी यांनी केले.गिरणा गौरव प्रतिष्ठानच्या वतीने हुतात्मा स्मारक येथे आयोजित पुस्तकावर बोलू काही या अभिनव उपक्रमात अनंत वाणी युरोप दर्शन या पुस्तकावर ऐसपैस गप्पा करत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अजित कुलकर्णी होते.प्राचार्य अनंत वाणी पुढे म्हणाले की,जग सुंदर आहे म्हणून पुथ्वीवरचे नंदनवन असलेली स्थळे पाहताना ते प्रत्यक्ष पुस्तकात माडंले आहेत. विदेशातील प्रेक्षणीय स्थळे जगातले आश्चर्य आहेत ते समजुन घ्यावे यासाठी युरोप दर्शन केले. जागतीकीकरणामुळे जग जवळ आले आहे. त्यामुळे मानव जातीला चांगली शिकवण या प्रगत देशामुळे मिळते. मानवी जिवनाच्या प्रत्येक बाजुला स्पर्श करणाऱ्या विज्ञान कला धर्म तत्वज्ञान अशा विविध गोष्टीचा अभ्यास करताना एक वेगळेपण जाणवले.आज पर्यटनाची संकल्पना व्यापक होत असुन नवा प्रदेश जनजिवनाचा परिचय करून घेण्याची जिज्ञासा युरोप दर्शन मुळे वाढली आणि चैतन्यमय अनुभुती घेण्यासाठी युरोप दर्शन करावे.यावेळी जयश्री राणे, साहेबराव उगले या भाग्यवान श्रोत्याना ग्रथभेट देऊन सन्मानीत करण्यात आले.सुहास टिपरे यानी आभार मानले तर सुरेश पवार यांनी सुत्रसंचालन के़ले.दरम्यान येत्या मंगळवार १९ मे रोजी रंजना बोरा मनपर्ण या पुस्तकावर ऐसपैस गप्पा करणार आहेत.
