
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित ३२७२ वा दिवस
यापुढे फक्त विधायक कामांना चालना द्यायची आहे. काही प्रसंगी कठोर टीका जरुरी असते पण ती काही काळच, सुयोग्य मार्ग मिळेपर्यंतच, गेल्या असंख्य वर्षांपासून फक्त टीकेचाच महापूर वाहत आहे भारतीयांच्या वैगुण्यावर पाश्चात्त्य बुद्धिवंतांनी भौतिक उपभोगवादी संस्कृतीने तोंडसुख घेतले आहे. त्याचाच परिणाम म्हणून आपल्यातल्या चांगल्या गोष्टींपेक्षा आपले दोषच फक्त समोर येत आहेत. आता हे पुरे झाले. मी आपणास विधायक मार्ग दाखवणार आहे. जे विघातक आहे ते विसरून जा. टीका, टिप्पणी, निंदा, द्वेष करण्याचा काळ आता संपला आहे. आपल्या समाजाच्या विस्कळीत समाजशक्ती एकत्र करून त्यात एकसूत्रीपणा आणू या!
*स्वामी विवेकानंद...*
●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●
★ भारतीय सौर वैशाख/माधवमास २६ शके १९४८
★ वैशाख शनि अमावस्या
★ शालिवाहन शके १९४८
★ शिवशक ३५१
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ विक्रम (रौद्र) संवत्सर २०८३
★ शनिवार दि. १६ मे २०२६
★ शनैश्वर जयंती
★ १६६५ पुरंदर किल्ला लढविताना मराठेशाहीतील स्वामीनिष्ठ सरदार मुरारबाजी देशपांडे यांचे प्राणार्पण स्मृतीदिन.
★ १९३१: भारतीय राजकारणी व माजी परराष्ट्रमंत्री के. नटवर सिंह यांचा जन्मदिन.
★ जागतिक कृषि पर्यटन दिन.
