
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित ३२७१ वा दिवस
गृहस्थाश्रम हा देखील मोक्षाचा एक मार्ग आहे. केवळ संन्यास हाच मोक्षाचा एकमेव मार्ग नाही. आपल्या कुटुंबाची आणि समाजाची जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडून देखील मोक्ष प्राप्ती होते. मात्र गृहस्थाश्रमी व्यक्तीने आपले जीवन केवळ स्वतःच्या स्वार्थासाठी न जगता, कुटुंबाच्या आणि समाजाच्या कल्याणासाठी समर्पित केले पाहिजे. घर हे स्वार्थाचे केंद्र नसून परमार्थाची, इतरांना मदत करण्याची शाळा असावी. भारतीय संस्कृतीत स्त्री ची माता म्हणून असलेली भूमिका अत्यंत उच्च आहे. स्त्रिया कुटुंबाचे तसेच समाजाचे आधारस्तंभ आहेत. कुटुंबामध्ये स्त्रीला आदर मिळणे आणि तिला स्वावलंबी करणे आवश्यक आहे. कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळताना हळूहळू आपला दृष्टिकोन व्यापक केला पाहिजे. संपूर्ण जग हे एक कुटुंब आहे. विश्व कुटुंबाचा दृष्टिकोन हा त्याग, सेवा, प्रेम, करुणा, परस्परांप्रती आदर आणि आध्यात्मिक एकता यांवर आधारित असावा. 'वसुधैव कुटुंबकम्' ही भावना विकसित करणे हे माणसाचे अंतिम ध्येय असावे.
*स्वामी विवेकानंद...*
●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●
★ भारतीय सौर वैशाख/माधवमास २५ शके १९४८
★ वैशाख वद्य /कृष्ण १३/१४
★ शालिवाहन शके १९४८
★ शिवशक ३५१
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ विक्रम (रौद्र) संवत्सर २०८३
★ शुक्रवार दि. १५ मे २०२६
★ १८१७ बंगाल प्रांतातील थोर समाजसुधारक देवेंद्रनाथ टागोर यांचा जन्मदिन.
★ १९०७ क्रांतीकारक सुखदेव थापर यांचा जन्मदिन
★ १९९३ स्वतंत्र भारताचे पहिले लष्करप्रमुख फिल्डमार्शल के. एम. करिअप्पा यांचा स्मृतिदिन.
★ २००४ नाशिकचे कवी, लोकशाहीर वामन दादा कर्डक पुण्यतिथी.
★ जागतिक कुटुंब दिन…
