
लेखक :- नवनाथ अर्जुन पाटिल गायकर. (लेखक इतिहास अभ्यासक व व्याख्याते आहेत.)
छत्रपती संभाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज.शुर सिंहाचा महापराक्रमी छावा.शत्रु च्या उरात धडकी भरवणारा बेदरकार राजा.दिल्लीच्या हिंदुविरोधी,धर्मांध व क्रुर औरंग बादशहालाही दरदरुन घाम फोडणारा. दुर्देवाने मराठयाचां हा बेदरकार राजा वतनासाठी गद्दारी करणार्या मराठी जयचंदानीच पकडुन दयावा हे या मराठी मुलखाचे,हिंदुचें केवढे दुर्दैव. अल्पायुषी ठरलेल्या संभाजी राजानीं छत्रपती पदावरील अवघ्या नऊ वर्षाच्या राजवटीत असंख्य लढाया लढल्या व यातली एकही लढाई त्यांनी गमावली नाही. संभाजी राजे लहानपणीच मातृप्रेमास पारखे झाले.पण आजी मातोश्री जिजाऊ यांची छत्रछाया त्यांना पुरेपुर मिळाली. पिता छत्रपती शिवाजी महाराज व मातोश्री जिजाऊ यांनी राजानां स्वराज्यप्पेम, हिंदु धर्म निष्ठेची शिकवण दिली.वयाच्या अवघ्या नवव्या वर्षी राजाबरोबर दिल्ली दरबारी भेट देण्याचा व मृत्युच्या सापळयातुन सहिसलामत सुटकेचा थरारक प्रसंग त्यांनी अनुभवला.यावेळी राजानीं लहान वयात जे बुद्धी चातुर्य, संयम दाखवला तो अद्भुत व अद्वितीय होता. मातोश्री जिजाऊ यांचे निधनानंतर ते खर्या अर्थाने पोरके झाले.युवराज म्हणुन अभिषेक झाल्यावर सावत्र माता सोयराबाई यांनी राज्य लोभातुन काही मंत्र्यास हाताशी धरुन गृहकलह माजवला ज्यामुळे त्यांना अतिव मनस्ताप झाला.पण तरीही ते या सर्वास पुरुन उरले. आयुष्यात सर्वगुणसंपन्न अशा येसुबाई त्यांना पत्नी म्हणुन लाभल्या.तर सावत्र असुनही निष्ठेने पाठिशी उभे राहिलेले सरसेनापती हंबीरराव मोहिते व प्राणप्रिय सखा,पर मुलखातील असुनही राजासोबतीने बलिदान देऊन अमर झालेले कवी कलश हा कनोजी ब्राम्हण यांच्या साथीने त्यांनी मराठा साम्राज्याच्या सीमा वाढवल्या. एकिकडे प्रबळ दिल्लीपती औरंग ला अंगावर घेत असतानांच दुसरीकडे हबसाणातील सिद्दी व इंग्रज, पोर्तुगीज यांनाही संभाजी राजानीं आपली औकात दाखवुन दिली. दख्खनेतील पुरातन आदिलशाही व कुतुबशाही औरंग च्या आक्रमणानंतर कोसळली असतानांही संभाजी राजानीं तडफेने तब्बल नऊ वर्षे बलाढय औरंग शी तडफेने झुंज दिली.हा लढा इतका संघर्षमय होता कि अखेरीस संतप्त व निराश औरंगने डोक्यावरचा किमॉश उतरवुन राजास पकडत नाही तोवर बोडके राहण्याची शपथ घेतली होती. दुर्देवाने वतनासाठी फितुर गणोजी शिर्के या सख्ख्या मेव्हण्यानीं गद्दारी करुन राजास बेसावध असतानां पकडुन दिली.राजानां वाचवता वाचवता सरसेनापती म्हाळोजी बाबा घोरपडे यांनी असंख्य मावळयासह बलिदान दिले. पकडलेल्या राजानां वश करण्यासाठी औरंगने नाना प्रकारे आमिषे दाखवली.पण जसे शिवाजी राजे आग्र्यात या ऐरंगपुढे झुकले नाही, तसेच राजे ही या क्रुर मोगलापुढे झुकले नाही.प्रचंड छळ सहन करत राजानीं देश, देव आणि धर्मासाठी अद्भुत असे बलिदान दिले. या बलिदानापुढे सर्व जग अचंबित झाले.या बलिदानातुनच पुढे पेटलेल्या मराठयांनी मोगलाचें दिल्लीचे तख्त मुळापासुन उखडुन टाकले. जयंती निमित छत्रपती संभाजी राजे यांना त्रिवार मानाचा मुजरा…
