
नांदगाव (प्रतिनिधी) दि.13 मे 2026 नादंगाव येथील, जे. टि. कासलीवाल इंग्लिश मिडीयम स्कूलच्या विद्यार्थ्यांचा CBSE केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल बुधवार दि. 13 मे रोजी ऑनलाइन पद्धतीने जाहीर झाला.या परीक्षेत विद्यार्थ्यांनी उत्तुंग अशी भरारी मारली. विज्ञान शाखेच्या या प्रथम वर्षाच्या बॅचमध्ये या परीक्षेस 20 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. सर्व विद्यार्थी विशेष प्राविण्यास उत्तीर्ण झाले. त्यापैकी 90% आणि त्याहून अधिकः2 विद्यार्थी, 80%आणि त्याहूनअधिकः12विद्यार्थी,75%आणि त्याहून अधिकः6 विद्यार्थी .100%निकालाची परंपरा विद्यार्थ्यांनी पहिल्याच वर्षी पूर्ण केली .त्यापैकी रोनक गंगवाल या विद्यार्थ्याने 92.%गुण मिळवून विद्यालयात प्रथम क्रमांक मिळविला. तर प्रीती सरोदे या विद्यार्थिनींने 90% गुण मिळवून द्वितीय तर यश निकम, हिमांशू चौरे, विधी साळुंखे या विद्यार्थ्यानी 87% गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळवत उत्तुंग निकालाची परंपरा कायम ठेवत विद्यालयास वैभव प्राप्त करून दिले. मेहनत, जिद्द आणि शिक्षकांच्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांना हे यश मिळाले आहे.
या विद्यार्थ्यांच्या यशस्वीतेसाठी प्राचार्य श्री मणी चावला व त्याच्या शिक्षकांनी खूप परीश्रम घेतले.या ऐतिहासिक कामगिरीबद्दल सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे तसेच मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे व पालकांचे संस्थेचे चेअरमन मा श्री. सुनिलकुमारजी कासलीवाल, उपाध्यक्ष सुशीलकुमार कासलीवाल तसेच संस्थेचे सेक्रेटरी विजय चोपडा, सहसचिव प्रमिलाताई कासलीवाल, विश्वस्त जुगलकिशोरजी अग्रवाल, रिखबचंद कासलीवाल ,महेंद्रभाऊ चांदीवाल, प्रकाश गुप्ता , प्रिन्सिपल मणी चावला.मुख्याध्यापक गोरख डफाळ,विशाल सावंत यांनी विद्यालयाच्या सर्व घटकांच्या वतीने अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
.
