
सिन्नर ( प्रतिनिधी )१४ मे २०२६ स्वराज्य रक्षक छञपती संभाजी राजे यांच्या ३६९ वी जयंती महामित्र परिवार,सीटी परिवार व आद्यक्रांतिकारक राघोजी भांगरे ब्रिगेड यांच्या वतीने सिन्नर येथिल शिवाजी चौक येथे शंभुराजेंना अभिवादन करण्यात आले*. *छञपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास व संभाजी राजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली*. *या कार्यक्रमाचे अध्यक्ष महामित्र दत्ता वायचळे म्हणाले की* ज्या मराठी माणसांच्या संवेदना जिवंत आहेत त्यांना सतत गतकाळातील काही गोष्टी मनामध्ये सलतात. जगद्गुरु तुकोबारायांना वैकुंठात अचानक विमान घेऊन कसे जाते ? प्रसन्न परमेश्वर भरल्या घरातून फक्त एकट्या तुकोबारायांना उचलुन उरलेले घरदार वाऱ्यावर कसा सोडून देऊ शकतो ? ‘तीर्थी धोंडा °पाणी देव रोकडा सज्जनी’ असे हयातभर सांगणाऱ्या तुकोबांचा स्वतःच्याच विचारसरणीचा पराभव आयुष्याच्या अंतिम क्षणी त्या महान जगद्गुरुने स्वीकारला असेल का ? अशा शंका मनात फेरधरु लागतात.तसेच अरबी समुद्रकिनारा पोर्तुगीजा-विरुध्द पेटवून उठविणारा छत्रपती संभाजीराजा अवघ्या नऊ वर्षाच्या कालखंडात २५०० लढाया लढल्या शंभुराजांना अलौकिक सौंदर्य जन्मजात प्राप्त होते. आधीच कर्तबगार, शुरवीर त्यात दिमाखदार व्यक्तीमत्वाची भर हजारो पुरुषांना हेवा वाटणारा चैनी युवा पिढीला जागे केल्याशिवाय राहणार नाही. अवघ्या ३१ वर्षे १० महिन्याच्या वयात वाघनख्यांनी कातडी सोलल्यावर आत तप्तपोलादी सळईने डोळे काढल्यावर इराद्यावर अटळ राहण्याची हिम्मत आजच्या तरुण पिढीला प्रेरणा देईल हा विश्वास वाटतो हिच शंभुराजांच्या ३६९ व्या जन्मदिनी मानाचा मुजरा*काॅम्रेड हरिभाऊ तांबे म्हणाले की* काहिंनी शंभूराजांना व्यसनाधीन,स्ञीलंपट,वाईट असे रंगविले गेले.त्यांना बदनाम केले गेले.शंभूराजांना सतरा भाषा येत होत्या.छञपती शिवाजी महाराजांनी उभे केलेले स्वराज्य बहुजनांना सोबत घेऊन शंभु राजांनी पुढे चालविले. *विजय मुठे म्हणाले की* शिवरायांच्या म्रुत्यूनंतर अनेक सत्तांना वाटत होते की,स्वराज्य आता टिकणार नाही.परंतु शंभूराजांनी स्वराज्यातील एकही किल्ला दुस-यांच्या ताब्यात जाऊन दिला नाही. संभाजी महाराज यांनी आयुष्यात अनेक लढाया लढल्या परंतु एकही लढाई शंभुराजे हरलेले नाहीत अशा न्यायी,कुणाला शरण न जाणा-या शंभू राजास विनम्र अभिवादन!*या कार्यक्रमाचे सुञसंचलन विजय मुठे यांनी केले.व प्रास्ताविक हरिभाऊ तांबे यांनी केले.तर आभार प्रकाश माळी यांनी मानले* यावेळी महामित्र दत्ता वायचळे, काॅम्रेड हरिभाऊ तांबे, आद्यक्रांतिकारक राघोजी ब्रिगेड चे सहसंस्थापक विजय मुठे, मा.नगरसेवक संजय झगडे प्रकाश माळी मनोज माळी, गणपत काळे, राजेंद्र जाधव प्रशांत शिंदे, बाळासाहेब साबळे महेश लोंढे विश्वास ताडगे भगवान पाचोरे गणेश माळी सोमनाथ लोहारकर आदी.उपस्थित होते.
