
नाशिक (प्रतिनिधी ) न्यु एज्युकेशन इन्स्टिट्यूट नाशिक संचलित श्री. डी डी बिटको बॉईज हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज च्या विद्यार्थ्यांनी फेब्रुवारी 2026 दहावी बोर्डाच्या परीक्षेत उत्तुंग यश संपादन केले आहे. शाळेचा एकूण निकाल – 94.04 टक्के लागला
प्रथम पाच विद्यार्थ्यांची नावे
1 )पात्रे दर्शन देवदत्त 92%
2 )जाधव वेदांत विष्णू 88.04%
3) कासार तनिष्क भगवान 88.04%
4 )चौधरी प्रमोद सुरेश 87.80%
5 )झुरडे चैतन्य रामेश्वर 87%
6) इककर तेजस तुकाराम 84.60%
विद्यार्थ्यांना डी डी बिटको बॉईज हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या मुख्याध्यापिका माननीय सौ कुशारे , उपमुख्याध्यापक माननीय श्री ठाकरे, पर्यवेक्षक सौ. गवारे, सर्व शिक्षक यांचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री. प्रकाशजी वैशंपायन साहेब, उपाध्यक्ष माननीय श्री. प्रभाकरजी कुलकर्णी साहेब साहेब, सेक्रेटरी माननीय श्री. हेमंतजी बरकले सर, शालेय समितीचे चेअरमन माननीय श्री रोहितजी वैशंपायन साहेब, अधीक्षिका माननीय सौ. पेठे मॅडम तसेच गव्हर्निंग कौन्सिल चे सर्व सदस्य यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे अभिनंदन केले.
