
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित ३२६९ वा दिवस
आपला देह म्हणजे जणू लोखंडाचा गोळा आहे आणि आपला प्रत्येक विचार म्हणजे जणू त्या गोळ्यावर हातोड्याने घाव मारणे होय. यातून आपण आपल्या देहाला जशी आपली इच्छा तसा घडवीत असतो. या जगाच्या सर्व चांगल्या विचारांचे आपण वारसदार आहोत, वाटेकरी आहोत, परंतु तसे होण्यासाठी आपण चांगल्या विचारांना खुल्या भावाने स्वतःमध्ये प्रवेश दिला पाहिजे. ते विचार आपल्यामध्ये सहज येण्यासाठी वाट अगदी मोकळी ठेवली पाहिजे. त्यात कसलाही अडथळा उभा राहता कामा नये. अवघे शास्त्र तर आमच्या आतच विद्यमान आहे, तर मग तुम्हाला या गोष्टी का ऐकू येत नाहीत? तुमच्या स्वतःच्या हृदय गाभाऱ्यात अहर्निश त्या शाश्वत संगीताचे झंकार उठत आहेत. अखंडं सचितानंदम् अखंडं सचितानंदम् सोऽहम् सोऽहम्
*स्वामी विवेकानंद...*
●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●
★ भारतीय सौर वैशाख/माधवमास २३ शके १९४८
★ वैशाख वद्य /कृष्ण ११
★ शालिवाहन शके १९४८
★ शिवशक ३५१
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ विक्रम (रौद्र) संवत्सर २०८३
★ बुधवार दि. १३ मे २०२६
★ अपरा एकादशी 🚩🚩🚩🚩🚩🚩
★ १६४८ दिल्लीच्या लाल किल्ल्याचे काम पूर्ण झाले.
★ २००१ सुप्रसिध्द इंग्लिश साहित्यिक, गाईड, मालगुडीका आदमखोरचे लेखक पद्मविभूषण रासीपूरम कृष्णस्वामी अय्यर नारायणस्वामी ऊर्फ आर. के. नारायण यांचा स्मृतीदिन.
★ २०१६ संत निरंकारी हरदेव सिंहजी महाराज यांचा स्मृतीदिन.
संकलन – प्रा. अमोल श्रीकृष्ण अहिरे, नाशिक
