
ओझर: (वार्ताहर) अखिल भारतीय मराठा महासंघ शंभू जन्मोत्सव समिती व एच ए एल अधिकारी-कामगार परिवाराच्या वतीने श्री. छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त गुरुवार रोजी (दि.१४मे) प्रसिद्ध शिवचरित्र अभ्यासक लेखक शंभू चरित्र’ या विषयावर ओझरच्या बोरस्ते विद्यालयाचे मुख्याध्यापक सोपान वाटपाडे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. सकाळी साडेअकरा वाजता रक्तदान शिबिराचे आयोजन करून दिवसभर भव्य ऐतिहासिक व शिवकालीन शस्त्र अस्त्र वस्तूंचे प्रदर्शन आयोजन करण्यात आले आहे. तसेच सायंकाळी साडेपाच वाजता प्रतिमा पूजन व दीपप्रज्वलन करून शंभू चरित्र व्याख्यान कार्यक्रम संपन्न होणार आहे. तरी परिसरातील शिवभक्त- शंभू भक्त यांनी संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन संयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे. या निमित्ताने संयोजन समितीने वेगळा आदर्श समाजासमोर ठेवला आहे.
