
यशोदामाता डायाभाई बिटको गर्ल्स हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज विद्यालयात महात्मा फुले यांना जयंतीनिमित्त अभिवादन करताना मुख्याध्यापिका सौ.सुनीता बाजपेयी, उपमुख्याध्यापक श्री.राजेंद्र सोमवंशी, पर्यवेक्षिका सौ.सुषमा गवारे,ग.कौ.सदस्य श्री.कैलास बागुल,सौ.भारती चंद्रात्रे आदि….

नाशिक ( प्रतिनिधी)-नाशिक येथील यशोदामाता डायाभाई बिटको गर्ल्स हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज मध्ये थोर समाजसुधारक क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांना जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. यशोदामाता डायाभाई बिटको गर्ल्स हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या मुख्याध्यापिका सौ.सुनीता बाजपेयी व उपमुख्याध्यापक श्री.राजेंद्र सोमवंशी यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले यावेळी पर्यवेक्षिका सौ.सुषमा गवारे ग.कौ.सदस्य श्री . कैलास बागुल,सौ.भारती चंद्रात्रे आणि शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी यांच्या उपस्थितीत महात्मा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. मुख्याध्यापिका सौ.सुनीता बाजपेयी यांनी महात्मा फुले यांच्या समाज सुधारणा आणि स्त्री शिक्षणाच्या महनीय कार्याला उजाळा दिला. उपमुख्याध्यापक राजेंद्र सोमवंशी यांनी महात्मा फुले यांच्या द्विजन्मशताब्दी वर्षानिमित्त विविध उपक्रम राबविण्याचे आवाहन केले. विद्यालयातील विद्यार्थ्यांसह शिक्षक आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

